औरंगाबाद:-दि.१ डिसेंबर (दीपक परेराव ) शेतकऱ्यांकडून सक्तीने वीज बिल केली जात आहे व पीकविमा कंपनीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे, शेतकऱ्यांना अजून अतिवृष्टीची भरपाई मिळाली नाही या शेतकरी विरोधी सरकारच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाली असून आज गंगापूर तालुक्यातील इसारवाडी फाटा रस्त्यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज (१ डिसेंबर) चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

यावेळी संतप्त शिवसैनिकांनी रस्त्यावर चारा जाळून सरकारचा निषेध व्यक्त केला.यावेळी आंदोलक शिवसैनिकांनी "शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत मिळालीच पाहिजे", "सक्तीची वीज वीज बिल वसुली थांबलीच पाहिजे", "शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा रक्कम जमा करा नाहीतर शेतकरी विरोधी सरकार चालते व्हा" या घोषणा देत मींधे सरकारचा निषेध केला.

अंबादास दानवे यांच्यासह शिवसैनिकांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करताच पोलिसांनी कारवाई करत अंबादास दानवे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.यावेळी विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी अस्मानी संकटात शेतकरी त्रस्त असताना शिंदे - फडणवीस सरकार कोणत्याही शेतकऱ्याची वीज कनेक्शन तोडणार नाही, अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा लवकरच मिळेल, असे सांगण्यात येत असून मुळात एकही आश्वासन पूर्ण केले नाही. सरकार कायम खोटी आश्वासन देत असून हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने या झोपलेल्या शेतकरी विरोधी सरकारला जागे करण्यासाठी शिवसेना आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर उतरली आहे. शिंदे फडणवीस सरकारने त्वरित शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या नसता संपूर्ण राज्यभरात याहीपेक्षा तीव्र आंदोलन या सरकारच्या विरोधात करण्यात येणार असल्याचा इशारा दिला.याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण सांगळे,अविनाश पाटील,अंकुश सुंभ, तालुका प्रमुख दिनेश मुथा, सुभाष कानडे, उपतालुकाप्रमुख विष्णू जाधव, मनोज पिंपळे, पोपट गाडेकर, ज्ञानेश्वर नवले, रमेश निचीत, विश्वंभर शिंदे जिल्हा युवा अधिकारी मच्छिंद्र देवकर, सभापती रवींद्र पोळ,मा.उपसभापती संपत छाजेड, किशोर मगर, ज्ञानेश्वर बोरकर, मनोज जयस्वाल,शहरप्रमुख भाग्येश गंगवाल,अमोल शिरसाठ, नंदू राऊत,बाबासाहेब मोहिते, कैलाश हिवाळे,नारायण ठोळे,पोपट गाडेकर,लक्ष्मण सुपेकर,बाळासाहेब शेळके,बाळासाहेब चंनघटे,गणेश राऊत,कारभारी दुबिले, पोपट नरवडे, प्रवीण दुबिले, कांता साळुंखे,राधेश्याम कोल्हे,गोकुल तांगडे,नितीन कांजूने,गोविंद वल्ले,लक्ष्मण बहिर,गणेश राजपूत,कारभारी दुबिले, रावसाहेब टेके, भिमराव ठोकळ,रवी पोळ, नारायण जाधव, बाळासाहेब एटकर, सुरेंद्र सूर्यवंशी, विश्वनाथ तांगडे, शुभम जाधव, राजेंद्र गावडे, अर्जुन मुळे, विजय जैस्वाल, सखाहरी सुकासे,शिवाजी शिंदे, विनोद इथापे, शरद गवादे, गणेश राऊत ,भास्कर रोडगे, विष्णू पोटे, जालिंदर राऊत, अंकुर निकम, उपशहरप्रमुख भगवान साळुंके, ग्रा. सदस्य संदीप मनोरे, राजेश उनोणे, आप्पासाहेब जाधव राहुल जाधव, निलेश शिंदे महिला आघाडी तालुका संघटिका अर्चना सोमासे गेलोत ताई ,नंदा पगारे, शोभा बनकर, ईले ताई, अनिता वाघचौरे आधी शिवसैनिक, पदाधिकारी, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.