तळेगावात महात्मा फुले यांची पुण्यतिथी पुढाऱ्यांनी केली 'थाटामाटात' साजरी

-पंचवीस वर्षांपासून गायब असलेले पुढारी अचानक झाले जागे

तळेगाव ढमढेरे, प्रतिनिधी :

तळेगाव ढमढेरे ता. शिरुर येथे नुकतेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १३२ व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम संपन्न झाला असून अनेक मंत्र्यांसह स्थानिक आमदार व गावातील पदाधिकाऱ्यांनी याकडे पाठ फिरवली मात्र पुढील निवडणुका डोळ्यासमोर ठेवत पंचवीस वर्षांपासून गायब असलेले स्थानिक पुढारी अचानक जागे झाले असल्याचे दिसून आले आहे. 

                           तळेगाव ढमढेरे ता. शिरुर येथे नुकतेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १३२ व्या पुण्यतिथीचे आयोजन उत्साहात करण्यात आले होते, मुळात जयंतीचा कार्यक्रम मोठा होऊन पुण्यतिथीचा कार्यक्रम साध्या पद्धतीने होणे गरजेचे असताना गेली अनेक वर्षांपासून या कार्यक्रमातून गायब असलेले स्थानिक पुढारी एकवटले आणि त्यांनी अचानक पुण्यतिथी कार्यक्रम उत्साहात करण्याचा निर्णय घेत मंत्र्यांचे फोटो टाकून कार्यक्रमाच्या जाहिरात बाजीवर लाखो रुपयांची उधळण केली मात्र प्रमुख पाहुणे असलेल्या आजी माजी मंत्र्यांनीच कार्यक्रमाला दांडी मारली त्यांनतर आयोजकांचे नियोजन तसेच काही स्थानिक पुढारी व नेत्यांना विश्वासात घेतले नसून पुढील निवडणुका डोळ्यासमोर ठेवत समाजाच्या नावाखाली तालुक्यातील लोकांना एकत्र करत महात्मा ज्योतिबा फुलेंचे नाव वापरुन राजकीय डाव टाकल्याचा प्रयत्न केला मात्र प्रमुख पाहुणे असलेले नेतेच गैरहजर राहिल्याने राजकारणाचा डाव फसला असल्याने दिसून आले.

*तळेगावातील यात्रा व फेस्टिवलचा नेत्यांना विसर*

तळेगाव ढमढेरे येथील पुण्यतिथीच्या आयोजकांतील काही पुढाऱ्यांनी यापूर्वी गावामध्ये नव्याने एक यात्रा व फेस्टिवल सुरु केले होते मात्र काही वर्षांपासून या पुढाऱ्यांनी सुरु केलेली यात्रा व फेस्टिवल नागरिकांना परत दिसलेच नाही त्यामुळे तळेगाव मधील त्या फेस्टिवल व यात्रेचा नेत्यांना विसर पडला कि काय असा देखील प्रश्न नागरिकांना पडला आहे.

*नागरिकांनी पुढाऱ्यांकडून कोणता आदर्श घ्यावा*

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्व समाजाचा विचार करत आदर्श निर्माण केलेला असताना तळेगाव ढमढेरे येथे आयोजकांकडून चक्क स्थानिकांना डावलून तसेच राजकारण डोळ्यासमोर ठेवून असे प्रकार घडत असल्यास या पुढाऱ्यांकडून समाजाने कोणता आदर्श घ्यावा असा सवाल गावातील स्थानिक नागरिकांना पडला आहे.