लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, जळकोट, उदगीर या तालुक्यात बी.आर. आंदे कॉन्ट्रॅक्शन या कंपनी मार्फत झालेले व चालू असलेले रस्ता काम, डांबरीकरण, सिमेंट रोड, नालीकाम, डिव्हायडरचे काम मोजमाप पुस्तके प्रमाणे न करता अतिशय निकृष्ट दर्जाचे काम करून कोट्यावधी रुपयाची शासनाची फसवणूक करीत असल्याने सदर कामाची गुण नियंत्रण पथका मार्फत चौकशी करून संबंधित शाखा अभियंता, उपविभागीय अभियंता यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून करावे व बी.आर. आंदे कॉन्ट्रॅक्शन कंपनीची मान्यता रद्द करून काळया यादीत टाकावे अशी तक्रार अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमद रफी यांनी मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक कार्यालय नांदेड येथे तक्रार करून उपोषणाचा दिला इशारा.

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, जलकोट, उदगीर या तालुक्यात बी.आर. आंदे कॉन्ट्रॅक्शन या कंपनी मार्फत 1)अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद ते वायगाव पाटी 2)जळकोट तालुक्यात घोणसी ते आतनूर डांबर रोड काम 3)उदगीर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जाकेर हुसैन चौक व जाकेर हुसैन चौक ते तोंडार पार्टी पर्यंत सिमेंट रोड व डीव्हायडर व रोडच्या दोन्ही बाजूने साईट पट्ट्याचे काम मोजमाप पुस्तिकेप्रमाणे होत नसून अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे 

हे रोडच्या काम साठी एक मीटर खंदणे व खांदवल्यानंतर रोड बांधणे गरजेचे असताना विना खोदकाम जुन्या डांबरी रोडवर सिमेंट रोड बांधून शासनाची फसवणूक व भ्रष्टाचार केले आहे सदर रोडवर डिव्हायडरचे खोदकाम न करता कमी सळई घालून एमबी प्रमाणे काम न करता बेकायदेशीर करून भ्रष्टाचार केले आहे व शासनाला कोट्यावधी रुपयाला लाटले आहे तसेच बांधलेल्या रोडच्या दोन्ही बाजूने एक मीटर खंदून मुरूम (खडक) घालणे अनिवार्य असताना त्यांनी खंदवलेले नाही व ज्या ठिकाणी खंदले आहे त्या ठिकाणी खंदलेली मातीच टाकून दबाई करून शासनाची फसवणूक केली आहे. सदर कामावर शासकीय अभियंता यांनी मार्गदर्शन व पाहणी केलेली नाही एकंदरीत वरील प्रमाणे अहमदपूर, जळकोट, उदगीर सर्व रोड काम व बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे बेकायदेशीर रित्याने मोजमाप पुस्तिकेप्रमाणे न करता खोटे व निकृष्ट दर्जाचे काम करून कोट्यावधी रुपयाची शासनाची फसवणूक व भ्रष्टाचार अभियंता व गुत्तेदार यांच्या संगनमताने केले आहे. *गुत्तेदार बी.आर. आंदे, उपविभागीय अभियंता देवकर,माजी मंत्री संजय बनसोडे यांची मिले सूर तुम्हारा हमारा ची घोषणा* सदर तिन्ही तालुक्यातील झालेल्या कामाची वरिष्ठ पातळीवर सखोल चौकशी करून गुत्तेदार व अभियंता यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून गुत्तेदार यांच्या सोसायटीची मान्यता रद्द करावी अशी तक्रार दिनांक 28/ 11 /2022 रोजी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमदरफी यांनी मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक कार्यालय नांदेड येथे तक्रार दिली आहे व या तक्रारीची तात्काळ दखल न घेतल्यास दि.19 /12 /2022 पासून बेमुदत आमरण उपोषणास बसणार असे तक्रारीत नमूद केली आहे यावेळी निवेदन निवेदन देताना अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमद रफी, अल्पसंख्यांक मराठवाडा अध्यक्ष शेख अजीम, नांदेडचे पत्रकार इमरान खान, फकीर कुरेशी, बॉडीगार्ड तानाजी भंडे व इत्यादी कार्यकर्ते सोबत होते