औरंगाबाद : वाळूज पोलीस ठाणे हद्दीतील टेम्भापुरी येथे शेतामध्ये काम करत असलेल्या एका महिलेला चाकूचा धाक दाखवून गळ्यातील मंगळसूत्र व कानातील झुंबर हिसकावून घेत पळ काढला.हि घटना दिनांक 27 रोजी सकाळी 11:30 वाजेच्या दरम्यान घडली.मीना डिगंबर ढोले (36)व सविता ज्ञानेश्वर ढोले (29)रा टेम्भापुरी गंगापूर ह्या दोन्ही महिला गट नंबर 50 मध्ये शेतात काम करत असतांना सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास काळ्या रंगाचा शर्ट घालून आलेल्या चोरट्याने मीना यांच्या गळ्याला चाकू लावत. मंगळसूत्र व कानातील झुंबर (9 ग्राम ) हिसकावून तेथून पळ काढला, दरम्यान कपाशी मोठी असल्याने सोबत असलेल्या सविता ढोले चोरट्याला दिसल्या नसल्याने त्यांच्याकडील सोने वाचले, घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे व कर्मचारी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून चोरट्याचा शोध घेत आहे, परंतु दिवसा ढवळ्या झालेल्या या घटनेमुळे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.