शिक्रापूरची सर्पमैत्रीण पूजा बांगरचा औरंगाबाद मध्ये गौरव

( शिक्रापूर प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर येथील सर्पमैत्रीण पूजा बांगर हि परिसरामध्ये कोठेही साप आढळून आल्यास त्या सापांना पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडून देत सापांना जीवदान देण्याचे कार्य करत आहे, तिच्या कार्याची दखल घेत संभाजीनगर - औरंगाबाद येथे संविधान दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र सेनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पूजा बांगर हिचा गौरव करण्यात आला, यावेळी महाराष्ट्र सेनेचे प्रमुख राजूभाई साबळे, प्रदेश उपाध्यक्ष अविनाथ थिट्टे, जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष शरद दाभाडे, शहराध्यक्ष प्रकाश भालेराव, नगरसेवक बाळासाहेब सानप, सर्पमित्र अभिलाष जाधव, सर्पमैत्रीण आम्रपाली जाधव यांसह आदी उपस्थित होते.