सनसवाडीत युवकाचा कुऱ्हाडीने मारहाण करून खून

शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञात नऊ युवकांवर गुन्हे दाखल

( शिक्रापूर प्रतिनिधी ) सनसवाडी ता. शिरूर येथे तीन दुचाकीहून आलेल्या नऊ जणांच्या टोळक्याने एका युवकाला कुऱ्हाडीने मारहाण करत गोपाळ महादेव लुडकर या युवकाचा खून झाला असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात नऊ युवकांवर खुना प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

                  सनसवाडी ता. शिरूर येथील दोन गटांच्या युवकांमध्ये भांडणे चाललेली असताना यावेळी शेजारून चाललेल्या गोपाळ लुडकर याला दगड लागला त्यामुळे त्यांने घरी फोन करून त्याचे मामा दिगंबर काळे यांना बोलावून घेतले, त्यामुळे दिगंबर हे त्यांचा भाचा गोपाळ याला घेऊन जात असताना तीन तिचा की वरून नऊ युवक सदर ठिकाणी आले त्यातील एका मुलाने आमच्या मुलांना का मारले असे म्हणून हातातील लोखंडी रॉड व कुऱ्हाडने गोपाळ लुडकर यास मारले तसेच गोपाळ चे मामा दिगंबर काळे यांना देखील पायावर मारहाण केली, मात्र यावेळी गोपाळ याला जास्त मारहाण झाल्याने तो गंभीर जखमी झाला त्यामुळे त्याला उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात घेऊन जात असतानाच त्याचा मृत्यू झाला. सदर घटनेत गोपाळ महादेव लुडकर वय २७ वर्षे रा. आरंभ प्रॉपर्टीज सणसवाडी ता. शिरूर जि. पुणे याचा मृत्यू झाला असून गोपाळचा मामा दिगंबर बापूराव काळे हा जखमी झाला आहे. याबाबत दिगंबर बापूराव काळे वय २८ वर्षे रा. आरंभ प्रॉपर्टीज सणसवाडी ता. शिरूर जि. पुणे मूळ रा. परळीजोड ता. परभणी जि. परभणी यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात नऊ युवकांवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर हे करत आहे.