वाशीम च्या अनसिंग येथे ३ डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिवस निमित्त दिव्यांगांना साहित्य वाटप करण्याचे आयोजन करण्यात आले आहे.

    अखिल भारतीय अपंग कामगार संघटना व वच्छलाबाई अपंग सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने निवासी मूकबधिर विद्यालय अनसिंग,ता.वाशीम याठिकाणी जागतिक अपंग दिनी (३ डिसेंबर) ४० दिव्यांगांना कुबड्या वाटप , काही दिव्यांगांना एल्बो काठी वाटप तर काही दिव्यांगांना थंडी निमित्त अंगावर पांघरून घेण्यासाठी ब्लंकेट वाटप करण्यात येणार आहे.भारत देशातील व सर्व राज्यातील तसेच विविध उद्योगातील असलेल्या अनुसूची प्रमाणे काम करणारे सर्व कामगार व दिव्यांग कामगार व कर्मचारी यांची संघटना म्हणून अखंड भरता मध्ये अखिल भारतीय अपंग कामगार संघटना ओळखले जाते.त्याच प्रमाणे त्यांची गाऱ्हाणी दूर करण्याचे प्रयत्न करणे, दिव्यांगाना एकत्रित आणणे,सदस्यांना त्यांच्या जीवन मानात आणि सेवेत सुख शांती प्राप्त करून देणे . कामगारांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचा प्रयत्न करणे , रोजगारामध्ये किंवा अनुशंगाने उद्भवणाऱ्या बाबीमध्ये सदस्यांना निधीसाहाय्य देणे असे प्रचंड कामगाराच्या न्याय हक्कासाठी ही संघटना काम करत असते . महाराष्ट्र शासन आणि कामगार आयुक्त कोंकण विभाग कार्यालय बांद्रा , मुंबई यांच्याकडून रजिस्टर असून महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त असणारी संघटना दिव्यांगाच्या सेवेसाठी सदैव तत्पर असते.तसेच कोरोनाची महामारी पसरलेली होती त्या काळात देखील आमच्या अखिल भारतीय कामगार संघटनेने अनेक कामगारांची घर बसल्या मदत पुरवली.तर अनेक शासनाचे कायदे दिव्यंगा करता निघाले परंतु जे यापासून वंचित राहिले आहेत अश्या गरजू दिव्यांगांसाठी अखिल भारतीय अपंग कामगार संघटनेच्या वतीने ४० दिव्यांगांना कुबड्या वाटप , काही दिव्यांगांना एल्बो काठी वाटप तर काही दिव्यांगांना थंडी निमित्त अंगावर पांघरून घेण्यासाठी ब्लंकेट वाटप करणार असून हा कार्यक्रम जागतिक अपंग दीनानिमित्त संघटनेने करण्याचे योजिले आहे.सदर कार्यक्रमास जिल्हाधिकारी वाशीम, शेषराव नवगुनकर,संघटनेचे पदाधिकारी,संस्थेचे पदाधिकारी, व सदस्य उपस्थित राहणार असून मान्यवरांच्या हस्ते दिव्यांगांना साहित्य वाटप प्रदान करण्यात येणार आहे .