परभणी प्रतिनिधी 

अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटना प्रदेशाध्यक्ष श्री विनोद अण्णा भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्र राज्य प्रशिध्दी प्रमुख श्री शेषराव सोपणे मामा यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी जिल्हा उपाध्यक्ष श्री साहेबराव भंडे यांनी पालम तालुका अध्यक्ष पदी श्री अवधूत जाधव यांची निवड करून प्रदेशाध्यक्ष श्री विनोद अण्णा भोसले व महाराष्ट्र राज्य प्रशिध्दी प्रमुख श्री शेषराव सोपणे मामा यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र प्रदान केल्यानंतर, नवनिर्वाचित अध्यक्ष श्री अवधूत जाधव यांची पालम तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली व प्रशिध्दी प्रमुख पदी श्री विलास वाघमारे, शहरप्रमुख पदी श्री सिताराम चुडावकर व रावराजूर सर्कल प्रमुख पदी श्री बाळासाहेब कदम यांच्या नियुक्त्या केल्या, यावेळी प्रदेशाध्यक्ष श्री विनोद अण्णा भोसले व महाराष्ट्र राज्य प्रशिध्दी प्रमुख श्री शेषराव सोपणे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या,

या वेळी महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष श्री विनोद अण्णा भोसले, महाराष्ट्र राज्य प्रशिध्दी प्रमुख श्री शेषराव सोपणे परभणी जिल्हा उपाध्यक्ष श्री साहेबराव भंडे, परभणी जिल्हा सल्लागार श्री माजी सैनिक श्री काशिराम पौळ पालम तालुका संघटक श्री गणपत चांदणे, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते,

यावेळी अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षण संघटनेच्या नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष अवधूत जाधव यांनी आपण या संघटनेच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे काम करून संघटना मजबूत करण्यासंदर्भात संकल्प केला 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री साहेबराव भंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री गणपत चांदणे यांनी केले,