चिपळूण : तालुक्यातील खेरशेत येथे बौध्दजन हितसंवरक्षक समितीच्यावतीने संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात

आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनील कदम होते.या वेळी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

या कार्यक्रमाचे शरद कदम यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ मार्गदर्शक चंद्रमणी कदम यांनी संविधानाची मुल्ये आणि त्याचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले. यासोबत शरद कदम यांनी देखील मोलाचे असे मार्गदर्शन केले. 

यावेळी बौद्ध उपासक निखिल कदम, महिला अध्यक्षा शैला कदम यांच्यासह यशोधरा महिला मंडळाच्या पदाधिकारी व तरुण युवा मंचाचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते.