नवजीवन शिक्षक पतसंस्था निवडणुकीत परिवर्तनाचे वारे

परिवर्तन पॅनलच्या निर्धार मेळाव्यास शिक्षक बंधू-भगिनींचा प्रचंड प्रतिसाद

बीड (रिपोर्टर): बीड तालुक्यातील नवजीवन शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवडणुक सहकार प्राधिकरणाच्या आदेशाने जाहिर झाली असून येत्या रविवारी दि. २७ नोव्हेंबर २०२२ रोजी मतदान होणार आहे. यासाठी गुरूवार (दि. २१) रोजी शहरातील रामकृष्ण लॉन्स याठिकाणी परिवर्तन पॅनलच्या वतीने निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास सभासद शिक्षक बांधवांनी उपस्थित राहून प्रचंड प्रतिसाद दिला. उपस्थित शिक्षक बंधु-भगिनींची संख्या लक्षणीय होती व यामुळे परिवर्तन पॅनलच्या विजयाचा एकप्रकारे कौलच सभासद मतदारांकडून मिळाला आहे. पतसंस्थेच्या हितासाठी, पारदर्शक कारभारासाठी परिवर्तन

उमेदवारांनी स्पष्ट केले आहे. पतसंस्था ही कर्मचाऱ्यांची मातृ संस्था असून तिच्या स्थैर्यासाठी पॅनल सदैव काम करेल. आत्तापर्यंत काही घटकांच्या फायद्यासाठी सेवानिवृत्त लिपीक पद हे भरले जात होते त्यातून चार लाख रूपयांपेक्षा अधिक वार्षिक खर्चाचा बोजा संस्थेवर पडत होता. हे पद आता भरले जाणार नाही, त्यामुळे चार लाखांपेक्षा अधिक बचत होईल. कर्जदाराच्या मागणीच्या दिवशीच त्याला दीर्घ कर्ज मंजुर व ऑनलाईन पद्धतीने सभासदाच्या खात्यावर जमा करण्यात येईल. तातडी कर्ज मर्यादा १ लाखपर्यंत वाढवून सभासदाच्या फोन कॉलवरच त्यांच्या खात्यावर जमा करून मागणी अर्ज नंतर भरून घेण्यात येईल. कर्ज मर्यादा २५ लाख पर्यंत वाढवण्यात येईल, व्याजदर प्रथम आठ टक्के व दिली असून त्या माध्यमातून कर्मचारी नंतर ७ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात येईल. सभासदाची शेअर्स मर्यादा पुर्ण

पॅनलमध्ये निष्कलंक चेहऱ्यांना संधी

हितासाठी काम करणार असल्याचे

झाल्यानंतर नवीन कर्ज देतांना पाच टक्क्यांऐवजी फक्त दोन टक्के शेअर्स कपात करण्यात येतील. पतसंस्थेमध्ये सूचना व तक्रार पेटी बसवून प्रत्येक महिन्याच्या मासिक सभेत त्या बाबत चर्चा करून संबंधित तक्रार सोडवली जाईल व सूचने बाबत कार्यवाही केली जाईल. सभासदांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशीच त्यांचे भाग भांडवल ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल. नवजीवन पतसंस्थेचे अॅप तयार करून सर्व सभासदांना लॉगीनद्वारे स्वतः च्या शेअर्स व कर्जाची माहिती पाहता येईल. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे संस्थेचे जमा असलेले भागभांडवल सुमारे ४० लक्ष रूपये वसुल करण्यात येतील. कन्यादानं योजना' सुरू करून सभासदांच्या मुलीच्या लग्नामध्ये ११ हजार रूपये कन्यादान म्हणुन देण्यात येतील व सर्वात महत्त्वाचे सभासद कुटुंब आधार

योजना' सुरू करण्यात येईल. या योजनेद्वारे सभासद कल्याण निधीमध्ये एक लक्ष रूपये ठेव जमा करून सेवेत असतांना सभासदाचा मृत्यु झाल्यास सभासदाच्या कुटुंबियांना ठेवीच्या २५ पट म्हणजेच २५ लक्ष रूपये देण्यात येतील. सभासदाकडे कर्ज असल्यास कर्ज वजा उर्वरित रक्कम खात्यावर जमा करण्यात येईल. ज्या सभासदाची ठेव १ लाख रूपयांपेक्षा कमी असेल त्याच्या जमा रक्कमेच्या २५ पट रक्कम देण्यात येईल. १ लक्ष रूपये कल्याण निधी कर्ज घेते वेळी भरणे शक्य नसेल तर सभासदाच्या विनंतीनुसार जमा शेअर्समधुनही कल्याण निधीमध्ये रक्कम वर्ग करता येईल अशा प्रकारच्या महत्त्वपुर्ण आणि महत्त्वकांक्षी योजना व सभासद हिताचे निर्णय निवडुण आल्यानंतर घेणार असल्याचे यावेळी परिवर्तन पॅनलच्या वतीने सांगण्यात आले आहे.