गुणात्मक अन्वेषणासाठी सर्वोत्तम कामगिरी केलेल्या पोलिस अधिकारी यांचा विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट बक्षीस वितरण करत सन्मान...

बिडकिन प्रतिनिधी:-

दिनांक 19/10/2021 व 20/10/2021 चे रात्री पोलीस ठाणे बिडकीन हद्दीतील तोंडोळी शिवारात फिर्यादी हा राहत असलेल्या शेतवस्तीवर अनोळखी 6 ते 7 आरोपीतांनी दरोडा टाकून फिर्यादीच्या दोन बहीनींवर लैंगीक अत्याचार करुन चांदीचे दागीने, मोबाईल व रोख रक्कम असा एकुण 70000/- रू किंमतीचा मुद्देमाल जबरीने चोरुन नेला वगैरे फिर्यादीवरुन पोलीस ठाणे बिडकीन येथे गुरनं 370/2021 कलम 376 (ड), 395, 397, 457,120 (ब), 307 भादंवि प्रमाणे दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर मा. श्री. के. एम. मल्लीकार्जुन प्रसन्ना, विशेष पोलीस महानिरीक्षक, औरंगाबाद परिक्षेत्र, औरंगाबाद यांनी घटनास्थळास भेट देवुन तपासाबाबत मार्गदर्शन करुन गुन्हा उघडकीस आणणेसाठी योग्य त्या सुचना दिल्या. त्यावरुन श्री. निमीत गोयल, तत्कालीन पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण, श्री. विशाल नेहुल, उप विभागीय पोलीस अधिकारी, पैठण, श्री. संतोष माने, सपोनि श्री. जगदीश मोरे, पोउपनि पोलीस ठाणे बिडीकन व त्याचे सहकाऱ्यांनी अथक परिश्रम करुन आरोपी नामे प्रभु शामराव पवार व त्याचे इतर 6 साथीदारांना अटक करुन गुन्हा उघडकीस आणुन गुन्हयात चोरी गेलेला मुद्देमाल जप्त केला.

आरोपी अटक झाले नंतर मा. श्री. के. एम. मल्लीकार्जुन प्रसन्ना, विशेष पोलीस महानिरीक्षक, औरंगाबाद परिक्षेत्र, औरंगाबाद यांनी सदर गुन्हात मोक्का कलम अंतर्भुत करण्याची परवानगी दिली व गुन्हयाचा तपास श्री. विशाल नेहुल, उप विभागीय पोलीस अधिकारी, पैठण यांचे कडे दिला.

सदर गुन्हयाचा चांगल्या प्रकारे तपास केल्याने गुणात्मक अन्वेषणासाठी सर्वोत्कृष्ठ बक्षीस मिळणे करीता मे / 2022 मध्ये मा. अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे यांचे मार्फतीने मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मा. पोलीस महासंचालक यांनी सदर गुन्हयांची निवड करुन श्री. विशाल नेहुल, उप विभागीय पोलीस अधिकारी, पैठण-5000/-, सपोनि / संतोष माने 2500, पोउपनि / जगदीश मोरे- 2500 पोलीस ठाणे बिडीकन असे 10000/- रु रोख बक्षीस जाहीर केल्याने आज दिनांक 25/11/2022 रोजी मा. श्री. के. एम. मल्लीकार्जुन प्रसन्ना, विशेष पोलीस महानिरीक्षक, औरंगाबाद परिक्षेत्र, औरंगाबाद यांनी श्री मनिष कलवानीया, पोलीस अधीक्षक, यांचे उपस्थितीत श्री. विशाल नेहुल, उप विभागीय पोलीस अधिकारी, पैठण, श्री. संतोष माने, सपोनि श्री. जगदीश मोरे, पोउपनि पोलीस ठाणे बिडीकन यांना औरंगाबाद परिक्षेत्र कार्यालयात विशेष कार्यक्रम आयोजीत करुन पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी दिलेले प्रशस्तीपत्र प्रदान करुन त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.

रविंद्र गायकवाड, बिडकिन