बीड (प्रतिनिधी) अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त माननीय श्री.एस.एस.देशमुख सर आणि मराठी पत्रकार परिषदेच्या बद्दल फेसबुक,वाटस अप आदि समाज माध्यमावर प्रशांत आष्टीकर या विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तीने अवमान कारक तसेच मानहानीकारक अशा पोस्ट समाज माध्यमावर प्रसारित केल्या आहेत. म्हणून प्रशांत आष्टीकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा.अशा मागणीची रितसर तक्रार बीड जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या कडे डिजिटल मिडिया परिषद आणि मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात आली आहे.

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख सर व त्यांचे कुटुंबीय व मराठी पत्रकार परिषदेबद्दल फेसबुक आणि वाटस अप वरुन बदनामी करणा-या पोष्ट विकृत मनोवृत्तीच्या प्रशांत आष्टीकर याने केल्या आहेत.या प्रकाराचा राज्यभरात मराठी पत्रकार परिषदेकडून निषेध केला जात असुन मुंबई पुण्यासह राज्यभरात आष्टीकर विरोधात गुन्हे दाखल करण्यात यावे अशा तक्रारी पोलिसांकडे दाखल करण्यात येत आहेत.त्या नुसारच आज दिनांक 24 ऑक्टोबर 2022 रोजी डिजिटल मिडिया परिषद आणि बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे बीड जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या कडे दाखल केली आहे.यावेळी या प्रकरणी चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येईल असे शिष्टमंडळाशी बोलताना पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितले.यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव विशाल साळुंखे, बीड चे जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे , जिल्हा सरचिटणीस विलास डोळसे, जेष्ठ संपादक नारायण नागरे सह आदी दिसत आहेत..