रांजणगाव गणपती: पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील मंगलमूर्ती विद्याधामच्या खेळाडूंनी तालुकास्तर शालेय कराटे स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले असुन नुकत्याच रांजणगाव गणपती येथील मोरया लॉन्स मध्ये या कराटे स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत मंगलमुर्ती विद्याधाम प्रशालेतील १० मुली आणि १० मुले असे २० खेळाडू वेगवेगळ्या गटात सहभागी झाले होते.
जिल्हास्तरावर निवड झालेले विद्यार्थी खालीलप्रमाणे
१४ वर्ष वयोगट
१)बच्चेबार सागर नारायण
२)पवार यशराज राजेंद्र
३) सिंह यशी अजयप्रताप
४)रसाळ श्रेया महादेव
५)साठे तेजस्विनी आशिष
१७ वर्ष वयोगट
१) पांदेवांड स्वप्निल बाबू
२)साठे दर्शन आशिष
३) हुसळे ऋषिकेश विजय
४)देवकर अथर्व शिवाजी
५)मोमीन जोया सलीम
६)चव्हाण समृद्धी संजय
७)गोरे पूजा दत्तात्रय
८) क्षिरसागर गौरी प्रताप
१९ वर्ष वयोगट
१)पवार वैष्णवी अरुण
२)सानप प्रांजली अजिनाथ
अशा एकूण १५ विद्यार्थ्याची जिल्हा स्तरसाठी निवड झाली असुन शाळेच्या क्रीडा शिक्षिका संजया नितनवरे यांचे विद्यार्थ्याना मार्गदर्शन लाभले. या भरीव यशाबद्दल शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल बोरा, शाळा समिती अध्यक्ष कांतीलाल बोथरा, सचिव नंदकुमार निकम, मुख्याध्यापक काशिनाथ वेताळ, पर्यवेक्षक सुभाष पाचकर सर, जिल्हा परीषद सदस्या स्वाती पाचुंदकर, पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर, सरपंच सर्जेराव खेडकर तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.