परळी- दि.24.(प्रतिनिधी) वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येत्या 26 नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिनानिमित्त येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा रेल्वे स्टेशन येथे भारतीय संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सहसचिव ॲड. संजय रोडे यांनी दिली आहे.

भारतीय संविधानामुळेच भारत हा आजही एकसंघ असून संविधानाच्या प्रत्येक कलमांमध्ये नागरिकांचे मूलभूत हक्क समाविष्ट असल्याकारणामुळे देशातील प्रत्येक नागरिकांस आपले जीवन सुखी व आनंदाने जगण्यास मुभा मिळाली आहे. 

हे समतेचे व न्यायिक जीवन जगत असताना काही असामाजिक व मनुवादी विचाराची माणसे संविधान बदलण्याची भाषा करीत असून त्यांना स्वातंत्र्य समता बंधुत्व व न्याय या मानवी मूल्यांची जोपासना नको असल्याने व आपल्याच समूह, वर्गाचे प्राबल्य सर्वच क्षेत्रात असावे असे वाटत असल्यामुळे आज देशामध्ये या विषमतावादी शक्ती अराजकता निर्माण करण्याचे काम करत आहेत. या विषमतावादी शक्तींना रोखण्याचे काम भारतीय संविधानामुळेच होणार असल्याने येत्या 26 नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान गौरव दिनानिमित्त परळी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा रेल्वे स्टेशन येथे भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा उपाध्यक्ष भाई गौतम आगळे, जिल्हा उपाध्यक्ष प्रसेनजीत रोडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालासाहेब जगतकर, प्रभारी तालुकाध्यक्ष गौतम साळवे, माजी तालुकाध्यक्ष संजय गवळी,शहराध्यक्ष गफार शहा आदी उपस्थित राहणार आहेत.

तर या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रिपाईचे ज्येष्ठ नेते भास्कर नाना रोडे, प्रा.दासू वाघमारे सर, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष ॲड.जे.के.कांबळे, रेल्वेचे निवृत्त आदर्श शिक्षक बनसोडे सर, प्रा. रघुनंदन खरात सर, प्राध्यापक चिंतामण खंडागळे सर, आदर्श शिक्षक महादू सावंत सर, ज्येष्ठ वकील ॲड. मिलिंद आचार्य, ॲड. जे.एल.आंधळे, ॲड. लक्ष्मण आघाव, ॲड.डि.के.जाधवर, ॲड.राहुल सोळंके,ॲड. अर्जुन सोळंके आदींची उपस्थिती लाभणार आहे.

तरी परळी शहरातील व तालुक्यातील सर्व संविधान प्रेमी स्वतंत्र समता बंधुत्व व न्यायवादी नागरिकांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा सहसचिव ॲड. संजय रोडे यांनी केले आहे.