वंचित बहुजन आघाडीची जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
बीड प्रतिनिधी / दि. 23 भारतीय संविधान दिन हा 26 नोव्हेंबर रोजी बीड जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयात साजरा केला जावा या मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांना देण्यात आले आहे. ज्या भारतीय संविधाना वर संपूर्ण देश चालतो, या ठिकाणची न्यायव्यवस्था, शासन व्यवस्था, राज्य व्यवस्था, सुरळीतपणे चालू आहे हा देश अखंड स्वरूपात आज भारतीय संविधानामुळेच उभा आहे, म्हणून भारतीय संविधान दिन सार्वजनिक स्वरूपात व मोठा उत्सव स्वरूपात संपूर्ण जिल्ह्यातील शाळेत व महाविद्यालयात साजरा केला जावा भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन केले जावे संविधान प्रतीची मिरवणूक काढली जावी संविधान जनजागृती पर व्याख्याने घ्यावीत, शाळेतील मुलांना संविधानाचे महत्वपूर्ण पटवून सांगणारे उपक्रम कार्यक्रम राबवले, अशा मागणीचे निवेदन पत्र देण्यात आले आहे.
या शिष्टमंडळाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील जिल्हाध्यक्ष उद्धव खाडे, ज्ञानेश्वर कवठेकर, युनुस शेख, बालाजी जगतकर अजय सरवदे, किरण वाघमारे मिलिंद सरपते,एड.राजेंद्र कोरडे उमेश तुळवे, आधी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.