नागपूर विभागात 6 हजारहून अधिक माजी मालगुजारी तलाव आहेत. या तलावांचे नूतनीकरणाचे कामे हाती घेण्यात येईल. विशेषत: मत्स्यपालनासाठी व त्यांच्या संरक्षणासाठी मोठा कृत्रिम खड्डा तयार करण्यात येईल ज्याचे पाणी माशांसाठी उपलब्ध होईल. मच्छीमार बांधवांची जाळी व बोटींची मागणी असून योजनेतून निश्चितच जाळी व बोटी उपलब्ध करून दिल्या जातील. जिल्ह्यातील मच्छिमार बंधू-भगिनींसाठी शासकीय योजना असून त्या शासकीय योजनांमधून अनुदान उपलब्ध करून दिले जाते. अनेक वर्षांपासून बोटीसाठी 3 हजार रुपये आणि जाळ्यांसाठी 1200 रुपये अनुदान दिले जात होते. त्या अनुदानात वाढ करण्यात येईल. अनुदानात वाढ केल्यानंतर जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांना डिपीडीसीमधून जाळी उपलब्ध करून दिली जाईल. तसेच किसान क्रेडिट कार्डप्रमाणेच जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांना क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यात येईल. मच्छीमार बांधवांना क्रेडिट कार्डद्वारे, जाळी व बोटींची दुरुस्ती करता येईल. यावेळी तलावाच्या स्वच्छतेचे काम करणाऱ्या मच्छीमार बांधवांचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले.