खेर्डा ग्रुप ग्रामपंचायतमध्ये 98 टक्के शांततेत मतदान 

पाचोड/ पैठण तालुक्यातिल खेर्डा ग्रुप ग्रामपंचायतींसाठी गुरूवारी दि.४ रोजी खेर्डा,पुसेगाव,खेर्डा तांडा,मोतितांडा,असिमपूर या ठिकाणी उत्साहात मतदान झाले. ग्रूप ग्रामंपचायतमध्ये ९८ टक्के मतदान झाले.

एकूणच प्रक्रिया शांततेत पार पडली. आज शुक्रवारी दि.५ रोजीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  ठिकाणी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.आपला योग्य उमेदवार निवडून देण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदान प्रक्रियेत आपला सहभाग घेतला. तत्पूर्वी मतदान केंद्रावर 

मतदान अधिकारी केंद्राध्यक्ष काही जणांची टीम यावेळी मतदान प्रक्रिया सुलभ होण्यासाठी कार्यरत झाली होती. कुठलाही गैरप्रकार होऊ नये, यासाठी पाचोड पोलिसानी फौज फाटा तैनात करण्यात आला होता. यावेळी मतदान

केंद्राबाहेर निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांसह त्या पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. 

पंचायत समिती आणि जिल्हा परिषदची रंगीत तालीम म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीकडे पाहिले जात आहे. या गावातून जास्तीत जास्त ग्रामपंचायत सदस्य निवडून देण्यासाठी गावातील स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी सकाळपासूनच त्यांनी मतदान केंद्राच्या १०० मीटर बाहेर अंतरावर सकाळपासूनच तळ ठोकला होता.

गावातील पक्षीय कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. यावेळी काही मतदारांना करण्याची सोय त्या कार्यकर्त्यांकडून होताना दिसून येत होती. लोकसंख्येच्या गावातील मतदान केंद्रावर सकाळच्या सुमारास कमी मतदार दिसून येत होते; मात्र मतदान केंद्राच्या प्रक्षत्र बाहेर मात्र गर्दीचे वातावरण होते.यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे सह आदी पोलिसांनी मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली.