रत्नागिरी : शहराजवळी अलावा येथील तरुण साहिल मोरेच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याचा आरोप असलेल्या मैत्रीणाला न्यायालयाने 15 हजाराच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामिन अर्ज मंजूर केला. मात्र दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत तपास अधिकाऱ्यांपुढे तिने हजेरी लावावी असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मिताली (वय 24) असे साहिलच्या संशयित मैत्रीणीचे नाव आहे. साहिलच्या नातेवाईकांनी तिच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मिताली हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मिताली हिने सत्र न्यायालयापुढे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता असे पोलिसांनी सांगितले. जामीन अर्ज नामंजूर करण्याची मागणी सत्र न्यायालयात झालेल्या अटकपूर्व जामिनाच्या सुनावणीवेळी सरकार पक्षाकडून मिताली हिच्या अटकपूर्व जामीनाला विरोध करण्यात आला हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असून तपास अद्याप अपुरा आहे. संशयित मिताली हिला जामीन मंजूर केल्यास ती तक्रारदार व साक्षीदार यांना धमकावण्याची शक्यता आहे. त्यामुळे अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर करण्यात यावा अशी मागणी सरकार पक्षाकडून करण्यात आली.