बीड ( प्रतिनिधी) *जिल्ह्यातील 1364 गावात ग्रामस्थांना पिण्याचे पाणी शुद्ध व गुणवत्तापूर्वक मिळण्याकरिता पाणी गुणवत्ता अभियानांतर्गत पाच प्रयोगशाळांमधून जैविक व रासायनिक तपासणी करून देण्यात येते मात्र आता ही तपासणी प्रयोगशाळेत सोबतच जलसुरक्षक व गावातील पाच महिलांच्या हाती सोपविण्यात आली आहे 1031 ग्रामपंचायतींना रासायनिक व जैविक जल स्त्रोत तपासणी किट उपलब्ध करून देण्यात आले असून पंचायत समिती स्तरावर सर्वांना जलस्त्रोत तपासणी किट प्रशिक्षण दिले आहे आता गावातील पाच महिला पिण्याच्या पाण्याच्या प्रत्येक स्त्रोतांची एक जैविक व अकरा रासायनिक तपासण्या करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी दिली आहे*
जिल्ह्यात 10995 पिण्याच्या पाण्याचे जल स्त्रोत असून हे सर्व स्त्रोत तपासण्याचे जबाबदारी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा यांच्या अंतर्गत येणाऱ्या पाच प्रयोगशाळां वर टाकण्यात आलेली होती
पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर अशा दोन टप्प्यात ही तपासणी मोहीम होत होती परंतु आता प्रत्येक तीन महिन्याला गावातच रासायनिक व जैविक तपासणीतील उपलब्ध झाल्यामुळे जलसुरक्षक व गावातील अंगणवाडी सेविका आशा कर्मचारी व बचत गटातील सदस्य याप्रमाणे पाच महिला सर्व जलस्त्रोत तपासणी करणार आहेत
जलस्त्रोत तपासणी केल्यानंतर त्यात दिलेल्या नमुन्याप्रमाणे तपासणी अहवाल गावातच सर्वांसाठी खुला करण्यात येणार आहे जलस्त्रोत जर बाधित आला तर त्यासंबंधी उपाययोजना करण्याबाबत ग्रामपंचायत नियोजन करणार आहे प्रयोगशाळेला व पाणी गुणवत्ता अभियान कक्षाला देखील अहवाल उपलब्ध देण्याच्या सूचना प्रशिक्षणामधून देण्यात आलेल्या आहे प्रशिक्षण घेण्यासाठी संजय मिसाळ, भारत नागरगोजे ,अमोल कुलकर्णी ,संतोष वाघमारे,
सय्यद सफदर अली गणेश खाडे यांनी परिश्रम घेतले आहे
जैविक तपासणीसाठी एक किट देण्यात आले असून त्यात पाण्याचा रंग काळा झाल्यास स्त्रोत जैविकदृष्ट्या बाधित झाला असे दिसून येणार आहे तात्काळ अशा स्त्रोतांवर निर्जंतुकीकरणासाठी उपाययोजना होणार आहे
जिल्ह्यातील प्रत्येक स्त्रोतांची 11 रासायनिक तपासण्या या कीट मधून करण्यात येणार असून प्रत्येक किट मध्ये 100 तपासण्या करण्याची क्षमता असून तशा प्रकारची रसायने उपलब्ध करून दिलेली आहेत हे सर्व रसायने दोन वर्षापर्यंत चांगल्या स्थितीत राहतील अशी व्यवस्था करून देण्यात आलेली असून तपासणी झाल्यानंतर त्याची नोंद केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली आहे
पंचायत समिती स्तरावरील प्रशिक्षणासाठी जिल्हास्तरावरून पाच प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून हे प्रशिक्षक प्रत्येक तपासणी करण्याचे थेट प्रात्यक्षिक प्रशिक्षणादरम्यान देत आहेत शिवाय पाणी तपासणी दरम्यान व नंतर काय काळजी घ्यावी अहवाल सहज उपलब्ध करण्याबाबत ची माहिती देत आहेत
या होणार रासायनिक तपासणे
१)पीएच (धातू विरघळलेले) , २)गढूळपणा,.
३) कठीणपणा (खूप क्षारयुक्त) ,
४)कॅल्शियम,
५)मॅग्नेशियम,
६)क्लोराईड , ७)अल्कालीनीटी ,
८)क्लोरीन अवशेष,
९)लोह ,
१०)नायट्रेट व ११)फ्लोराईड
सर्व जलस्त्रोतांची गावातच तपासणी झाल्यानंतर त्यांचे तपासणी अहवाल व फोटो त्यांच्या नोंदी केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर करावयाचे आहेत त्यामुळे ह्या तपासण्या करणे अत्यंत आवश्यक असून त्याचा पाठपुरावा सतत सुरू राहणार आहे
या तपासण्यांसोबतच जलस्त्रोतांचे पाणी पुन्हा प्रयोगशाळेकडे पाठवणे देखील आवश्यक असल्याचे प्रशिक्षणा दरम्यान सांगण्यात आले प्रयोगशाळा व गावातील तपासणी दोन्हींच्या नोंदी केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर होणार आहेत अशी माहिती जिल्हा प्रकल्प संचालक चंद्रशेखर केकाण यांनी दिली आहे .