रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा हायस्कूल जवळ भरधाव क्रेनचे ब्रेक निकामी झाल्यामुळे चालकाने प्रसंगावधान राखून क्रेन एका बाजूला घेत गटारात न्हेऊन अपघात केला. हा अपघात रविवारी ( 20 नोव्हेंबर 2022) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडला. 

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

प्रत्यक्षदर्शनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रेक निकामी झालेली क्रेन पालीच्या दिशेने जात असताना हातखंबातील उतारात अचानक ब्रेक निकामी झाल्याचे चालकाला लक्षात आले. चालकाने हायस्कूल जवळ गाडीचा वेग कमी करण्याचा प्रयत्न केला. काही अंतरावरच गतिरोधक असल्याने ट्रॅफिक जाम होत असतानाही गाडी नियंत्रणात आणण्यासाठी चालकाने प्रयत्न केले. मात्र रस्त्याच्या एका बाजूला दरी व उतार असल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखून गाडी डाव्या बाजूला घेत रस्त्याच्या गटारात उतरवून अपघात केला. सुदैवाने या अपघातात कोणालाच दुखापत झाली नाही. जर चालकाने क्रेन बाजूला घेत हा अपघात घडवून आणला नसता तर गतिरोधकावर ट्रॅफिकमध्ये असलेल्या गाड्यांना धडक देऊन चार ते पाच गाड्या चिरडण्याची शक्यता होती. परंतु चालकाच्या प्रसंगावधानाने ब्रेक निकामी झाल्यानंतरही क्रेनवरील ताबा न सोडता रस्त्याच्या कडेला क्रेन घेऊन अपघात केल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. यामुळे चालकाचे वाहनचालकांकडून कौतुक केले जात आहे.