पाटोदा (प्रतिनिधी) २० नोव्हेंबर १७५० रोजी कर्नाटकातील देवनहल्ली येथे जन्मलेल्या टीपू सुलतान यांचे पूर्ण नाव सुलतान फतेह अली खान शहाब होते.टिपू सुलतान यांची पहिला क्षेपणास्त्र मनुष्य म्हणून ओळख असून टिपू सुलतान हे स्वतंत्र्यासाठी शहीद होणाऱ्या राजा पैकी एक होते. त्यांच्या कार्यकाळात वैज्ञानिक संशोधन, भूगर्भशास्त्र, उद्योग, कृषी विकासात्मक कार्याला यशस्वीपणे चालना मिळाली होती. तर राष्ट्रीय एकात्मतेची प्रेरणा देणारे, देशाला सुपर पॉवर बनवणारी विचारधारा त्यांची होती. अशा भारत देशातील शूरवीर राजाच्या जयंती निमित्त पाटोद्यात रविवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी नगरपंचायत समोर इस्लामपुरा यंग ग्रुप व युवकांनी रक्तदान शिबिर व हिजामा कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते ह्या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी उदंड प्रतिसाद दिला टिपू सुलतान जयंती निमित्त 272 तोफाची सलामी देत विविध सामाजिक उपक्रम घेऊन पाटोद्यात टिपू सुलतान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली