शिरुर: शिरुर तालुक्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव एमआयडीसी मधील फियाट कंपनीमध्ये दोन कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या BVG कंपनीच्या संचालकांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे यांनी गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव आणि महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सदर घटनेची चौकशी होऊन BVG कंपनीच्या संचालकांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
रांजणगाव औद्योगिक क्षेत्रामध्ये फियाट कंपनीमध्ये काही दिवसांपुर्वी मच्छिंद्र दादाभाऊ काळे आणि सुभाष सुखदेव उघडे या दोन कामगारांचा ड्रीम एरिया जवळील मैलाच्या चेंबरमध्ये काम करत असताना पडून मृत्यू झाला होता. सदर कामगार हे फियाट कंपनीमध्ये BVG कंपनीच्या मार्फत कंत्राटी कामगार म्हणून हाउस कीपिंगचे काम पाहत होते. मात्र या कामगारांना कुठल्याही प्रकारच्या सेफ्टीबाबत प्रशिक्षण न दिले गेल्यामुळे या कामगारांचा मृत्यू झाला आहे. कित्येक दिवस उलटूनही या प्रकरणाची चौकशी होत नसल्यामुळे नाथा शेवाळे यांनी मुंबई मंत्रालय येथे या प्रकरणात बाबत अप्पर मुख्य सचिव (गृह विभाग) आणि पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सदर घटनेची चौकशी होऊन BVG कंपनीच्या संचालकांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. पोलिस महासंचालकांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहे अशी नाथा शेवाळे यांनी 'शिरुर तालुका डॉट कॉम' शी बोलताना दिली.