चिपळूण अर्बन बँकेच्या संगणक विभागप्रमुखा विरोधात ३७ लाख पयांच्या अपहार प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात गुरुवारी याबाबत गुन्हा दाखल झाला. याबाबतची फिर्याद मुख्य व्यवस्थापक संतोष विजय देसाई यांनी दिली. हा प्रकार ८ सप्टेंबर २०२० ते १ ऑगस्ट २०२२ या कालावधीत घडला असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. शुक्रवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दि. २२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. काही दिवसांपासून चिपळूण अर्बन बँकेत कर्मचाऱ्याकडून अपहार झाल्याचे उघड झाले होते. बँकेच्या अध्यक्षा राधिका पाथरे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत या अपहाराची माहिती देत असताना या प्रकाराची संपूर्ण चौकशी सुरु असल्याचे सांगितले होते. यानंतर संबंधित कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला जाईल, असे स्पष्ट केले होते. याबाबतची फिर्याद मुख्य व्यवस्थापक देसाई यांनी येथील पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार राहुल रमेश सुर्वे (३१, मूळ रा. खेर्डी, शिवाजी नगर, सध्य सती) हा चिपळूण अर्बन बँकेत संगणक विभागप्रमुख म्हणून काम करतो. त्याने पासवर्डचा गैरवापर करून हेतुपुरस्सर ग्राहकांच्या खात्यातील ३७ लाख ७५ हजार ४५ रुपये २० पैसे इतक्या रकमेचा अपहार करून बँकेची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. यानुसार सुर्वेविरोधात गुन्हा दाखल झाला व त्याला अटक करण्यात आले. काल त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दि. २२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे करीत आहेत.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ग्राम इंद्रपुरिया में हरियालो राजस्थान , एक पौधा मां के नाम केशोरायपाटन
ग्राम इंद्रपुरिया में हरियालो राजस्थान , एक पौधा मां के नाम
केशोरायपाटन
अभियान तहत,...
Airtel set to lead India’s 5G revolution :: Airtel acquires 19867.8 MHz spectrum in 900 MHz, 1800 MHz, 2100MHz, 3300 MHz and 26 GHz frequency bands through the auction for Rs 43,084 cr. Spectrum secured for 20 years
AZIR KHOBOR, Guwahati, AUGUST 01, 2022: Bharti Airtel (“Airtel”), India’s...