धर्माबाद तालुका प्रतिनिधी-सिद्धेश्वर मठपती
धर्माबाद शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने.काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी बेताल वक्तव्य करून संपूर्ण देशभक्ताचा अपमान केला.असून
महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राच्या आराध्या विषयी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी अपशब्द बोलणाऱ्या राहुल गांधी यांच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्ष धर्माबाद च्या वतीने राहुल गांधीच्या प्रतिमेला जोडामारो आंदोलन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष रवींद्र पोतगंटीवार , शहराध्यक्ष बाबू गंधेलवार, जिल्हा संयोजक साईनाथ शिरपूरे, नगरसेवक संजय पवार,सनीत शकरवार, नानकसिंग धिल्लो, नारायण पाटील पवार , अँड. चक्रेश पाटील , ललेश पाटील,दत्ताहारी पाटील बेलगुजरीकर शहराध्यक्ष बाबू गंधेलवार हे उपस्थित होते.