खेड: उत्तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुणबी समाज हक्क परिषदेचे नियोजन प्रथमच करण्यात येत आहे. या कुणबी परिषदेस राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेकर उपस्थित राहिल्यास आमचे सुख-दुःख, अडी-अडचणी, राजकीय नेत्यांपासून होणारी हेटाळणी, सारे काही समजून घेतील आणि आम्हाला न्याय मिळवून देतील, असा विश्वास वंचित आघाडीने व्यक्त केला असून या कुणबी हक्क परिषदेला वंचित आघाडीचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव, उपजिल्हाध्यक्ष प्रदिप गमरे तसेच महासचिव नितीनदादा जाधव, त्याचबरोबर अविनाश आदवडे, म हासचिव चिपळूण तालुका सतिशदादा जाधव या पदाधिकाऱ्यांना बैठकीला पाचारण करावे, असे आवाहन केले आहे.
उत्तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अशा हक्क परिषदेचे नियोजन प्रथमच होत आहे. नमुद केलेल्या हक्क परिषदेस फक्त आणि फक्त कुंणबी समाज असणार आहे. अधिक माहितीसाठी नितीन जाधव - ८०८०१४२२१४, अविनाश आदवडे- ९४२२६२५७८१, महेश जाधव- ९१४५६०३०४८, सतिश जाधव- ९३०७०२८७५४, अण्णा जाधव- ७२७६६ ०९१९१ यांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.