औरंगाबाद :- दि.१९ नो.(दीपक परेराव) दि. 14 नोव्हेंबर 22 ते दि.20 नोव्हेंबर 22 देवगिरी बँकेत सहकार सप्ताह अंतर्गत विविध उपक्रम ,कार्यक्रमाचे नियोजन असते त्यानिमित्त गंगापूर शाखेत सहकार मेळावा घेण्यात आला.
कार्यक्रमाला सहाय्यक निबंधक सहकारी संस्था गंगापूर चे श्री. किरण चौधरी यांनी सहकार शेती चे विशेष महत्त्व विशद केले.तसेच किसान संघाचे जेष्ठ पदाधिकारी श्री प्रतापराव चव्हाण यांनी सहकार याविषयातील विविध संस्था राष्ट्र उभारणीमध्ये सहकाराचा सहभाग या विषयी मार्गदर्शन केले. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. बेले साहेब यांनी सहकार माध्यमातून शेती व्यवसाय त्याला पुरक व्यवसायात अधिक ज्ञानार्जन करुन ,प्रशिक्षण घेऊन आधुनिक शेती आणि अधिक उत्पन्न याविषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ पदाधिकारी श्री.अँड योगेश जाधव सहकार आणि कायदा याचे विषयी माहिती सांगितली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संचलन शाखाधिकारी श्री. संजय डाखोरकर यांनी केले.
सुरुवातीस भारतमाता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन मा. पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमासस विविध सहकारी पतसंस्थाचे शाखाधिकारी, पदाधिकारी तसेच बँकेचे मा. सभासद, खातेदार व ग्राहक यांची उपस्थिती होती. याप्रसंगी श्री. अमोल चापे,श्री. इम्रान शेख,श्री. अशोक कांबळे,श्री. जालिंदर दहितुले पोलीस उपनिरीक्षक श्री. ज्ञानेश्वर साखळे साहेब, श्री. सिध्दार्थ काळे श्री. राधाकिसन खैरे तसेच महिला खातेदार श्रीमती साखरबाई लहु कांबळे, श्रीमती लताबाई साठे इत्यादींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे आभार श्री संतोषजी पुदाट यांनी मानले.तसेच गंगापूर शाखेचे जेष्ठ कर्मचारी श्रीमती वर्षा मजकुरे श्री. गणेश धनायत, श्री.महेंद्र मकासरे श्री दिपक वंजारे यांनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.