रत्नागिरीः ऑनलाईनच्या युगात सध्या फसवणूकीचे प्रकार वाढले आहे. उच्च शिक्षित असलेले लोकच फसणूकीचे बळी पडत आहे. मात्र कर्ज मंजूर करण्यासाठी मिळणाऱ्या कर्जाच्या रक्कमेपेक्षा जास्त रक्कम मोजूण फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबधीत तरुणाने शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. ८ लाखांच्या कर्जासाठी त्यांनी तब्बल ९ लाख २६ हजार रुपये संबधीत व्यक्तीला दिले होते.
साई आनंद प्रसादे (३४, रा. कासारवेली) यांनी शहर पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांना राजेश नडीमेटला (रा. सोलापूर) या व्यक्तीने पुण्यातील आक्सीस बँकेतून ८ लाख रु. चे कर्ज मंजूर करुन देतो असे सांगितले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून श्री. प्रसादे यांनी दि. २२ मार्च ते सप्टेंबर २०२२ अखेर तब्बल ९ लाख २६ हजार रुपये कर्ज मंजूर करण्यासाठी संबधीत व्यक्तींची बँक खात्यावर जमा केले होते. त्यानंतरही कर्ज मंजूर न झाल्याने श्री. प्रसादे यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
मात्र ८ लाखांच्या कर्जासाठी प्रसादे यांनी तब्बल ९ लाख २६ हजार रु. दिले. कर्जाच्या रक्कमेपेक्षा कर्ज मंजूर करण्यासाठी जास्त पैसे कसे दिले असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीसांनी राजेश नडीमेटला याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक आकाश साळुंखे करत आहेत.