वैजापूर - एका ज्येष्ठ नागरीक व्यक्तीने ४० वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना तालुक्यातील मनुर येथे उघडकीस आली.या प्रकरणी एक वर्षानंतर बुधवारी पोलीसात गून्हा दाखल करण्यात आला आहे. पुंजाराम कचरु दवंगे (६५) रा मनुर असे या घटनेतील आरोपीचे नाव आहे.
सदर महिला ही सासेगाव ता कन्नड येथील रहिवासी आहे.दवंगे याने तिला तुझ्या पतीला दारु सोडण्याचे औषध देतो म्हणून त्याच्या घरी बोलावून घेतले.सदर महिला दवंगे याच्या घरी गेल्यानंतर त्याने तिला एका पडीक घरात नेले.तेथे त्याने तिचा हात धरून बळजबरीने तिला खाली पाडले व तिच्या वर बलात्कार केला.तसेच ही घटना कुणाला सांगीतल्या तुला मारून टाकीन अशी धमकी दिली.ही घटना वर्षभरात पुर्वी घडल्याचे पिडीत महीलेचे म्हणणे आहे.परंतु दवंगे याने जिवे मारण्याची धमकी दिल्याने तिने ही घटना कुणाला सांगीतली नाही .परंतु शेवटी बुधवारी पोलीस ठाणे गाठून तिने आपली आपबिती सांगितली.या प्रकरणी सदर महीलेने दिलेल्या फिर्यादीवरून पुंजाराम दवंगे विरुद्ध शिवूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक श्रीराम काळे हे करीत आहेत.