वैजापूर
या भूतलावरील जो व्यक्ती संतांच्या सत्संगात राहतो त्यालाच जीवनात खरी शांती मिळते असे अमृत वचन येथील जैन स्थानकातिल कार्यक्रमात राष्ट्रसंत भारत गौरव आचार्यजी पुलकसागर जी गुरुदेव यांनी केले ,ते पुढे म्हणाले की,जिवंतपणी जो व्यक्ती आपल्या जीवनात सर्वांशी स्नेहपूर्वक ,सद् भाव,सदवर्तनाने ,सद् विचार व प्रामाणिकतेने राहतो, व जिवंतपणी आपल्या जीवनात स्वर्ग निर्माण करतो त्याव्यक्तीला मृत्यू नंतर ही स्वर्ग मिळतो असेही ते पुढे म्हणाले, महिलांच्या बाबत ते म्हणाले की,महिलांनी दुसऱ्याचे अपशब्द सहन करण्याची क्षमता विकसित केली तर त्यांच्या जीवनात सदा सर्वदा सुख, समृद्धी,व समाधान लाभते असेही आचार्य पुलकसागरजीने प्रतिपादित केले, या प्रसंगी माजी आमदार भाऊसाहेब पाटील,शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र साळुंके,माजी सभापती बाबासाहेब जगताप,जीवनशेठ संचेती,विशाल संचेती माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, तालुका काँग्रेस चे अध्यक्ष प्रशांत पा,सदाफळ,निलेश पारख,प्रशांत कंगले,साईनाथ मतसागर,प्रकाश बोथरा,राजू संचेती,शोभचंद संचेती,धोंडीरामसिंह राजपूत,भगवान साळुंके,बाळासाहेब चव्हाण,हेमंत संचेती सह शहरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते,विजय कासलीवाल, यांनी संचलन केले,डॉ,संतोष गंगवाल, यानी आभार मानले.