मुंबई: मुंबई-गोवा हायवेलगत नारायण राणे यांच्या फार्म हाऊसच्या बाजूला एका एका ऑडी गाडीत मृतदेह मिळाला असून एकच खळबळ माजली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पनवेल पोलीस घटनास्थळी पोहचले असून गाडीची कसून तपासणी सुरु आहे. मृत व्यक्ती गाडीच्या मागच्या बाजूला मृत अवस्थेत आढळला असून मृताच्या नाका तोंडातून रक्त येत असल्याचं दिसत आहे. हा नक्की काय प्रकार आहे, याचा तपास सुरु आहे.
मुंबई- गोवा हायवेलगत केंद्रिय मंंत्री नारायण राणे यांचं फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसच्या बाजूलाच एका लाल रंगाच्या ऑडी कारमध्ये (नोंदणी क्रमांक- MH14 GA9585) हा मृतदेह आढळला आहे. या घटनेनं एकच खळबळ माजली आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच पनवेल पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु केला आहे. दरम्यान ही कार इथं कशी आली आणि या कारमधील मृतदेह नेमका कोणाचा आहे, याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती अजून मिळू शकली नाही. अधिक माहिती मिळताच बातमी अपडेट केली जाईल.