कासारीच्या माजी उपसरपंचावर विनयभंगाचा गुन्हा

( शिक्रापूर प्रतिनिधी ) शिरुर तालुक्यातील एका माजी उपसरपंचावर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाल्याची घटना ताजी असताना आता कासारी येथील ग्रामपंचायतच्या माजी उपसरपंचावर शेतीच्या वादातून महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे माजी उपसरपंच किरण महादू रासकर याचे विरुद्ध विनयभंग प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

                        कासारी ता. शिरुर येथे एका इसमाची वडिलोपार्जित जमीन असून सदर इसम त्याची पत्नीसह शेतात गेलेला असताना सदर शेत नांगरले असल्याचे त्यांना दिसले त्यांनतर ते पती पत्नी घरी येत असताना त्यांना रस्त्यात किरण रासकर भेटला त्यावेळी त्यांनी त्याला तुम्ही आमचे शेत का नांगरले, अजून शेताच्या वाटण्या झालेल्या नाही असे म्हटले असता किरण याने त्यांना दमदाटी करत महिलेच्या अंगावर धावून जात तिला धक्काबुक्की करत महिलेला मारहाण करुन महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले, दरम्यान महिलेचे पती मध्ये आले असता महिलेच्या पतीला देखील हाताने मारहाण करत शिवीगाळ, दमदाटी केली, घडलेल्या प्रकाराबाबत महिलेने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी कासारीचे माजी उपसरपंच किरण महादू रासकर रा. सोनारमळा कासारी ता. शिरुर जि. पुणे याचे विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस नाईक ज्योती आहेरकर करत आहे.