औरंगाबाद:- दि.१८ नो.(दीपक परेराव)विरोधी पक्षनेते पदी निवड झाल्याबद्दल कन्नड तालुक्यातील दहिगाव, नचानवेल, सेलगांव, वाकद आदी ठिकाणी नागरी सत्कार करण्यात आला. व आमदार उदयसिंग राजपूत यांच्या विशेष प्रयत्नातून करण्यात आलेल्या कन्नड, सोयगाव मतदार संघातील विविध विकासकामांचे भूमिपूजन देखील करण्यात आले. 

या वेळी उपस्थित शेतकऱ्यांशी व ग्रामस्थांशी संवाद साधत असतांना. ते म्हणाले शेतकरी सामान्य कार्यकर्ते शिवसेनेत विश्वासाने प्रवेश करायला लागले आहेत. त्यामुळे येणारा काळ जरी संघर्षाचा असला तरी निष्ठा महत्त्वाची आहे. संघर्ष कराल तेवढे अभूतपूर्व यश मिळेल,जे सत्तेवर आहेत त्यांना वाकवण्याची ताकत फक्त शिवसेनेत आहे. हे लक्षात ठेवा. 

कृषिप्रधान म्हणणाऱ्या महाराष्ट्रात नुसत्या घोषणाच होत असून वास्तविक कोणतेही काम होतांना या सरकार च्याकाळात दिसत नाही. शेतकऱ्यांना त्यांच्याच हक्काच्या असणाऱ्या पिकविम्याचा मोबदला मिळत नाही. महाराष्ट्रात ठिकठिकाणी अतिवृष्टी झाल्याने उभे पीक वाहून गेले शेतीच्या झालेल्या नुकसानामुळे महाराष्ट्रातील शेतकरी बांधव हवालदिल झालेला असून. आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहे. सरकारच्या धोरणांवर महाराष्ट्रातील जनता नाराज असल्याचे मत देखील यावेळी बोलतांना त्यांनी व्यक्त केले.

त्याचबरोबर मुख्यमंत्री आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करण्याच्या नुसत्या घोषणा करत आहे. परंतु महाराष्ट्रात मागील ४ महिन्यात जवळपास ११३० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. युवकांना मिळणारा रोजगार देखील यांनी गुजरातच्या घशात घातला असून या सरकारला जनतेची पर्वा नसल्याचे चित्र स्पष्टपणे आपल्याला दिसून येते. मात्र काळजी करू नका केवळ मूठभर मावळ्यांनी इतिहास रचला होता. त्याचप्रमाणे आम्ही बाळासाहेबांचे निष्ठावान शिवसैनिक आहोत. शेतकऱ्यांच्या, नागरिकांच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध आहोत. असे अभिवचन उपस्थित शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना दिले.

यावेळी, आमदार उदयसिंग राजपूत, अवचित वळवळे संजय मोटे गजानन मनगटे संदीप सपकाळ विठ्ठल मनगटे संजय पिंपळे विश्वास मंगते विजय घुले रावसाहेब पवार रवी पिंपळे पोलीस निरीक्षक कोमल शिंदे सरपंच,उपसरपंच यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते