रांजणगाव गणपती: रांजणगाव MIDC तील कंपनीतून गुरुवार (दि 17) रोजी रात्री 11:30 च्या सुमारास कंपनीतून कामावरून सुटून पायी चाललेल्या कामगाराला विना नंबर असलेल्या दोन दुचाकी वरुन पाच जणांनी फायटरचा धाक दाखवत त्याच्याजवळील मोबाईल चोरुन मारहाण केली होती. त्यानंतर या युवकाने पोलिस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला.
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
त्यानंतर रांजणगाव MIDC पोलिस ठाण्याचे कर्मचारी रात्रीच्या वेळी गस्तीला असताना पोलिसांना औद्योगिक वसाहतीत पाच जण संशयितरीत्या फिरत असल्याचे दिसले. पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी आधी उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनीच त्या कामगाराचा मोबाईल चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडुन चोरलेला मोबाईल आणि दोन विना नंबर असलेल्या दुचाकी जप्त केल्या आहेत.
याबाबत 1) देवानंद विलास धवसे (वय 21) सध्या रा. कवठे येमाई, ता. शिरुर, जि. पुणे मूळ रा. सावळी बहिणाराव, ता. औंढानागनाथ, जि. हिंगोली, 2) शुभम बाळासाहेब कुंभार (वय 23), 3) अभिजित संतोष कांदळकर (वय 19) दोघेही रा. कवठे येमाई ता. शिरुर, जि. पुणे या तिघांना अटक करुन शुक्रवार (दि 18) रोजी शिरुर न्यायालयात हजर केले असता त्यांना रविवार (दि 20) पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अंकित गोयल, पुण्याचे अप्पर पोलिस अधिक्षक मितेश गट्टे, शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे, पोलिस हवालदार विलास आंबेकर, विजय सरजिने, पोलिस नाईक पांडुरंग साबळे, राजेश ढगे, पोलिस कॉन्स्टेबल सुरज वळेकर, शुभम मुत्याळ यांनी केली असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे हे करत आहेत.