कलर्स मराठी वरील चॅनलवर सुरु असणारी "सिरीयल बाळुमामाच्या नावानं चांगभलं"या मालिकेमध्ये बाप्पु ही भूमिका करत असणारा आकाश खेडकर रा.तिंतरवणी ता.शिरूर का.जि.बीड या गावातील एक कलाकार आहेत.
कॅलेज जीवना पासून ते मुंबई प्रवास अभिनयाची आवाड असणारा अभिनेता होण्याची स्वप्न बघणारा आज नशिब अजमावत पोहचला फिल्मी दुनियेत. कुठल्याही क्षेत्रात ध्येय यश अपयश हे असतच.अभिनयाची आवड असल्याने त्याने शहरातील बलभिम कॅलेजला नाट्यशास्त्र विभागात पदवी घेतली.अभिनयाच्या आणि नाटकाच्या अभ्यासाच्या जोरावर त्याने सांस्कृतिक मंत्रलय नवी दिल्ली कडून देण्यात येणारी एकलाख पन्नास हजाराची यंग आर्टीस्ट स्कॅालरशीप देखिल पटकावली.कॅलेज जीवनात शिक्षण घेत असताना त्याने विविध नाटकाच्या स्पर्धातुन बशिक्ष कॅालेजला मिळवून दिली. त्याने स्वत:चा उदरनिर्वाह भागण्यासाठी विविध विषयाची तीन हजार पथनाट्य केली. रेडिओवर युवावाणी या कार्यक्रमात कायम तो स्वतःच्या कवितेच काव्यवाचन देखिल करत असायचा.कालंतराने त्याने फिल्मला सह दिग्दर्शकाची देखिल कामे केली. कॅमेरा मागे काम करणारा आकाश आज कॅमेरा समोर आला आणि आपल्या अभिनयाची झलक दाखवत कलर्स मराठीवरील लोकप्रिय "मालिका बाळुमामाच्या नावानं चांगभलं" यात बाप्पु नावाची भुमिका साकारत आहे. चंदेरीदुनियत आज तो काम करत आहे. यशस्वी होण्यासाठी जो मार्ग अपण निवडला त्याला अनेक पर्याय असतात. फक्त खचून जायचं नसतं संघर्ष आणि उमेद आकाश ने कधीच सोडली नाही म्हणुन तो आज कलर्स मराठीवरील बाळुमामाच्या मालिकेत रोज रात्री 7:30 वा सर्व महाराष्ट्राला दिसतो.