बीड (प्रतिनिधी) डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद आधीसभा (सिनेट) निवडणूक २०२२.वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशान्वये व प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली "वंचित बहुजन परिवर्तन पॅनल" ही निवडणूक लढवत आहे.
वंचित बहुजन परिवर्तन पॅनलच्या प्रचारार्थ बीड येथील वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संपर्क कार्यालयामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
वंचित बहुजन आघाडीचे विभागीय अध्यक्ष अशोक हिंगे पाटील महिला आघाडीच्या सविताताई बावणे यांचे सह वंचित बहुजन परिवर्तन पॅनल चे प्रमुख प्रकाश इंगळे खुल्या वर्गातील उमेदवार पंकज बनसोडे ,नितीन फंदे ,सरकटे विलास, तडवी अनिस शरीफ,तसेच जोगदंड रोहित (एस सी प्रवर्ग) बर्डे भागवत (एसटी प्रवर्ग )आघाव विनोद (व्ही.जे एन टी प्रवर्ग ) गायकवाड नंदा (महिला प्रवर्ग), हे उमेदवार बैठकीला उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे बोलताना म्हणाले की, विद्यापीठाच्या सर्वोच्च सभागृहात वर्षानुवर्ष तेच ते प्रस्थापित शिक्षण सम्राट सत्तेचा व बाळाचा दुरुपयोग करून निवडून येतात परिणामी विद्यार्थी व प्राध्यापकांची प्रचंड पिळवणूक करतात हेच प्रस्थापितांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी वंचित बहुजन परिवर्तन पॅनल मधील सर्व उमेदवारांना प्रथम क्रमांकाचे पसंती क्रमांक देऊन भरघोस मतांनी विजय करा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
तर मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील म्हणाले की,वंचित बहुजन परिवर्तन पॅनल चा जाहीरनामा हा विद्यार्थी प्राध्यापकांच्या हितसंबंध जोपासणारा असून नवीन शैक्षणिक धोरणास अनुकूल असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सहसचिव पुरुषोत्तम वीर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा कार्यकारणीतील भारत तांगडे,अंकुश जाधव, सुदेश पोतदार ,बालाजी जगतकर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख डॉ.गणेश खेमाडे,अजय सरोदे, महिला जिल्हाध्यक्ष ॲड.अनिता चक्रे, पुष्पा तुरुकमारे, नंदा भंडारे तालुकाध्यक्ष पप्पू गायकवाड,किरण वाघमारे डॉ.संजय नाकलगावकर, किशोर भोले,लखन जोगदंड, सुशील काकडे, विश्वजीत डोंगरे,भैया जावळे,संदीप जाधव,श्रीकांत वाघमारे,अजय साबळे यांचे सह बीड शहरातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.