औरंगाबाद , शेतकरी कुंटुबातील मराठा तरुणांना नवनवीन उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी महामंडळ नेहमीच प्रयत्न करीत आहे. मराठा समाजामधून देखील तरुण उद्योजक घडावेत यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कटीबद्ध आहे. मराठा समाजाची आर्थिक प्रगती साध्य करण्यासाठी वैयक्तिक व गट कर्ज व्याज परतावा योजना राबविल्या जात असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आज दिली. औरंगाबाद जिल्ह्यातील अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कामकाजाचा आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा अग्रणी बँकेचे अध्यक्ष मंगेश केदार, कौशल्य व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सुरेश वराडे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडाळाचे प्रवीण पाटील, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे अनिलकुमार दाबशेडे, देवगिरी नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे यांच्यासह सर्व राष्ट्रीयकृत बँकेचे व सहकारी बँकेचे शाखा व्यवस्थापक, लाभार्थी व संघटनेचे प्रतिनिधी यांची या बैठकीस उपस्थिती होती. राष्ट्रीयकृत बँकानी प्रलंबित प्रकरणे मंजुर करण्यामध्ये आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच लाभार्थ्यांनी कर्जव्याज परतावा योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खात्याचे ‘सिबील’ अहवाल निर्दोष कसा राहील याची काळजी घ्यावी. महामंडाळाचे कर्ज प्रस्ताव ग्रामीण भागातील तरुणांचे अधिक असल्याने या योजनेच्या माहितीचे बँनर लावावे व जास्तीत जास्त तरुणांना उद्योजक होण्यासाठी मदत करण्याचे नरेंद्र पाटील यांनी आवाहन केले.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
સમી : પોલીસ કોન્સ્ટેબલ ઉપર જીવલેણ હુમલો | SatyaNirbhay News Channel
સમી : પોલીસ કોન્સ્ટેબલ ઉપર જીવલેણ હુમલો | SatyaNirbhay News Channel
Monkey Pox से कैसे बचेंगे, हेल्थ एक्सपर्ट से समझिए कितना खतरनाक और कितना डरने की जरूरत है? | Aaj Tak
Monkey Pox से कैसे बचेंगे, हेल्थ एक्सपर्ट से समझिए कितना खतरनाक और कितना डरने की जरूरत है? | Aaj Tak
Arunachal Governor attends High level security meeting with army commander
GOVERNOR SUGGESTS FOR GOOD MAINTENANCE OF THE BORDER ROADS FOR THE BENEFIT OF THE LOCAL...
সোণাৰিত গাঞ্জা সহ এজনক আটক
সোণাৰিত গাঞ্জা সহ এজনক আটক
আজি বিয়লি প্ৰায় ৪:৩০ বজাত খামলুং চাৰিআলি, সোণাৰি -নামতোলা...