राजापूर : शहरातील कोदवली आणि अर्जुना नदीपात्रातील गाळ उपसण्यासाठी सामाजिक संस्था नाम फाऊंडेशनने पुढाकार घेतला असून आता राजापूर नगर पालिका, महसूल प्रशासन आणि लोकसहभागातुन राजापूरच्या या दोन्ही नद्या गाळमुक्त होणार आहे. याच्या नियोजनासाठी मंगळवारी (ता.२२) नोव्हेंबरला राजापुरात लोकसहभाग सभेचे आयोजन केले आहे.राजापूर शहरातील नगर वाचनालय सभागृहात सकाळी ११ वाजता प्रांताधिकारी वैशाली माने यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार आहे. या गाळ उपशासाठीच्या लोकसहभागात प्रथम सहभाग दर्शवत राजापूर नगर वाचनालयाने या लोकसहभाग सभेसाठी मोफत सभागृह उपलब्ध करून दिले आहे.शहरातील कोदवली आणि अर्जुना नदीपात्रातील गाळ उपसाकामी सामाजिक संस्था नाम फाऊंडेशनने पुढे येथे गाळ उपसण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र या कामासाठी लोकसहभागाचीही तेवढीच आवश्यकता असुन या गाळमुक्ती अभियानात जास्तीत जास्त लोकांचा सहभाग असावा यासाठी आता नगरपालिका व महसूल प्रशासनाच्या वतीने लोकसहभागातुन हे अभियान राबविले जाणार आहे. यासाठी प्रांताधिकारी वैशाली माने यांच्या अध्यक्षतेखाली राजापूर शहर गाळ निमुर्लन समिती गठीत केली असून या समितीत विविध सामाजिक संघटना, सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख सदस्य आहेत.राजापूर शहरातील या गाळ उपशासाठी नाम संस्थेने घेतलेला पुढाकार लक्षात घेता आपण सगळयांनी यासाठी योगदान देणे आवश्यक असून यासाठी लोकांना आवाहन करण्यात येत आहे. यासाठी आता २२ नोव्हेंबरला राजापूर गाळ निमुर्लन समितीसह विविध संघटना पदाधिकारी, राजकीय पक्ष व त्यांचे पदाधिकारी, मंडळे, संस्था, सामाजिक कार्यकर्ते, शहरातील सर्व माजी लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांची एक बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला नाम फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित राहाणार आहेत, असे तहसीलदार शीतल जाधव यांनी सांगितले.
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं