आयटीआय ग्राउंड व छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे दिली भेट

बीड दि.17 (प्रतिनिधी):- शहरासह संपूर्ण मतदारसंघातील नागरिकांचे आरोग्य उत्तम रहावे याकरीता आ.संदीप यांनी आवश्यक त्याठिकाणी आपल्या निधीतून ओपन जिम उभारल्या. याच धर्तीवर आता बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे महिलांसाठी जिल्ह्यातील पहीली स्वतंत्र जिम उभा करण्यात येणार असल्याचे आ.संदीप क्षीरसागर यांनी सांगितले.

गुरुवार दिनांक 17 रोजी सकाळी शहरातील नागरीकांसाठी व्यायामाचे केंद्र असलेल्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण व आयटीआय ग्राउंडवर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व नगरसेवकांना सोबत घेऊन भेट दिली. यावेळी व्यायामासाठी आलेल्या नागरिकांची भेट घेऊन संवाद साधत याठिकाणी असणार्या असुविधा जाणून घेतल्या. याप्रसंगी महिलांनी संवाद साधताना आ.क्षीरसागरांकडे स्वतंत्र ओपन जिम असावी अशी अपेक्षा व्यक्त केली. यावर आ.क्षीरसागरांनी ऑन द स्पॉट निर्णय घेत माझ्या आमदार निधीतून महिलांसाठी स्वतंत्र ओपन जिम उभारली जाईल असे आश्‍वासित केले. दरम्यान, नविन लाईट पोल बसवणे,जुने लाईट पोल दुरूस्ती करणे, स्वच्छतागृह दुरूस्ती करणेसाठीच्या सुचना आ.क्षीरसागर यांनी नगरपरिषदेचे संबंधित अधिकारी यांना केल्या. यावरून आ.संदीप क्षीरसागर यांचे नागरिकांचे आरोग्य उत्तम रहावे याकडे विशेष लक्ष असल्याचे स्पष्ट होते.