शिरूर तालुक्यात भरधाव लक्झरीने वारकऱ्याला चिडले

पूणे नगर महामार्गावर एक वारकरी चिरडून ठार तर एक जखमी

( शिक्रापूर प्रतिनिधी ) सध्या कार्तिकी एकादशी निमित्ताने महाराष्ट्रातील अनेक ठिकाणहून वारकरी आळंदी येथे येण्यास सुरुवात झालेली असताना शिरूर तालुक्यातील पुणे नगर महामार्गावर भरधाव वेगाने आलेल्या लक्झरी कार ने चिरडल्याने ओम चैतन्य कानिफनाथ महाराज पालखी सोहळा या दिंडीतील गुलाब मोहदीन शेख या वारकऱ्याचा लक्झरी खाली चिरडून मृत्यू झाला असून बबन महादेव वाखारे हे वारकरी जखमी झाले असल्याने रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे शिवकुमार विश्वास या लक्झरी चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

                   पुणे नगर महामार्गावरील खंडाळा माथा येथून गोलेगाव येथील ओम चैतन्य कानिफनाथ महाराज पालखी सोहळा ही दिंडी आळंदी कडे जात असताना दिंडी व अनेक वारकरी पुढे चाललेले होते तर यावेळी गुलाब शेख हे वारकरी पाठीमागे माईक घेऊन चाललेले होते, सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अहमदनगर बाजूने एम पी ४१ पी ६६६३ ही लक्झरी कार भरधाव वेगाने आली, यावेळी दिंडीच्या पाठीमागे चाललेले गुलाब शेख यांच्या अंगावर लक्झरी गेल्याने ते लक्झरी खालीच चिरडले गेले, तर बबन वाखारे हे वारकरी देखील जखमी झाले तर यावेळी काही तप्त नागरिकांनी लक्झरीवर दगडफेक करत काचा देखील फोडल्या, घटनेची माहिती मिळताच रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे, हवलदार संतोष पवार महिला पोलीस नाईक विद्या बनकर यांसह आदींनी घटनास्थळी गाव घेत पाहणी केली, तरी येतील जखमींना रुग्णालयात हलवले, यावेळी झालेल्या अपघातात वारकरी गुलाब मोहदीन शेख वय ५९ वर्षे रा. गोलेगाव ता. शिरुर जि. पुणे यांचा मृत्यू झाला तर बबन महादेव वाखारे वय ६५ वर्षे रा. गोलेगाव ता. शिरुर जि. पुणे हे जखमी झाले असून याबाबत प्रकाश संजय शिंदे वय २५ वर्षे रा. गोलेगाव ता. शिरूर जि. पुणे यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने रांजणगाव पोलिसांनी लक्झरी चालक शिवकुमार विश्वास वय ४३ वर्षे रा. बंगाली कॉलनी रामकृष्ण नगर हौशांगाबाद मध्यप्रदेश याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करत त्याला ताब्यात घेतल्या असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय सरजीने हे करत आहे.