मुंबई: ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाला आहे. पण, ठाकरे गटाच्या नेत्यांनी संजय राऊत यांच्यावर झालेली कारवाई ही सूड बु्द्धीने करण्यात आली होती. असा जोरदार हल्लाबोल ठाकरे गटाने शिंदे गटावर केला होता. ठाकरे गटाचीच री ओढत नुकताच शिंदे गटात गेलेले गजानन कीर्तीकर यांनीही त्यांना पाठिंबा दर्शवला आहे.
संजय राऊत यांच्यावर झालेली कारवाई ही चुकीची असल्याचे सांगत संजय राऊत पाठराखण गजानन कीर्तीकर यांनी केली असल्याचे दिसून आले. त्यांनी त्यांची पाठराखण केल्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. नुकतेच शिंदे गटात सामील झालेले अगोदर ठाकरे गटाचे नेते आणि आता शिंदे गटाचे झालेले गजानन कीर्तीकर यांनी संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांची पाठराखण केली आहे.
संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर गजानन राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, संजय राऊत यांच्यावर करण्यात आलेला आरोप हा किरकोळ होता, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले आहे. खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर ठाकरे गटाने समर्थन केले असले तरी शिंदे गटातील काही नेत्यांनी त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकाराचे आरोप केले होते.
संजय राऊत यांनी स्पष्टीकरण देत यावर सध्या काही बोलणार नाही असे स्पष्ट सांगितले होते. मात्र, शिंदे गटात गेलेल्या गजानन कीर्तीकर यांनी मात्र न्यायालयाने जे म्हटले आहे तेच बरोबर आहे असे म्हणत त्यांनी त्यांची पाठराखण केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात गजानन कीर्तीकर यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.