परभणी,दि.16: राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त येथील जिल्हा माहिती कार्यालयात ‘राष्ट्रीय पत्रकार दिन’ साजरा करण्यात आला. कार्यक्रमास यावेळी जिल्ह्यातील पत्रकार सर्वश्री राजू हट्टेकर, प्रभू दिपके, सुरेश नाईकवाडे, लक्ष्मण मानोलीकर, अरुण रणखांबे, लक्ष्मीकांत बनसोडे, शिवशंकर सोनवने, विवेक मुंदडा, विजय कुलकर्णी, शेख इफ्तेखार, संजय घनसावंत आणि जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांची उपस्थिती होती.
वृत्तपत्र स्वातंत्र्याची आणि पत्रकारितेतील वृत्तपत्र स्वातंत्र्याची जपणूक होऊन पत्रकारीतेतील उच्च मुल्यांचे संवर्धन व्हावे यासाठी प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियाची 16 नोव्हेंबर, 1966 रोजी स्थापन करण्यात आली. या अनुषंगाने सन 1997 पासुन दरवर्षी 16 नोव्हेंबर हा प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियाचा स्थापना दिवस ‘राष्ट्रीय पत्रकार दिन’ म्हणुन देशभर साजरा करण्यात येतो. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने सर्व पत्रकार बंधू-भगिनींना राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त यावेळी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील शिवाजी गमे, गजानन शिंदे, श्री. मुजमुले, श्री. ढाकरे, श्रीमती साखरे, श्री. पांचाळ यांनीही अभिवादन केले.