परळी ( प्रतिनिधी ) परळी ते अंबेजोगाई राष्ट्रीय महागार्गाचे रोडचे काम करणारी मे.‌ए.जी.रोड कंस्ट्रक्शन कंपनी औरंगाबाद यांनी कन्हेरवाडी गांवातील बौद्ध वस्ती लगतचे नाली बाधकाम जाणीणू बुजून केले नाही त्यामुळे बौद्ध वस्ती लगत च्या कुटंबातील रहिवाश्यांना गावातील नालीचे घाण पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे मुख्य हायवे वर येण्यासाठी मोठे हाल. सहन करावे लागत असून‌ त्याच बरोबर नालीचे घाणीमुळे दुरगंधी सहन करावी लागते शिवाय त्यामुळे साथीचे आजार आणी रोगराई पसरण्याची भिती रहिवाशां मध्ये निर्माण झाली आहे. याशिवाय गांवातील खंडोबा मंदीराजवळील ही नालीबांधकाम नाही केल्यामुळें मंदीरात नालीचे घाण पाणी शिरत आहे महणून अनेक भाविक भक्तांना दर्शनासाठी मोठी करत करावी लागत अशी भावना व्यक्त केली आहे म्हणून या रोड कंस्ट्रक्शन कंपनी औरंगाबाद यांचे मॅनेजर शेख सलिम / शेख अस्लम यांच्यावर अनुसुचित जाती‌/ जमाती (अत्याचार निवारण ) कायदा 1989 च्या 3 ( 2 ) 5 नुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते लहुदास रोडे , नागुराव बापु बहिरे आणी रहिवाशांनी लेखी मागणी परळी उपजिल्हाधिकारी कार्यालय यांचे कडे केली असता कंपनी वर अनुसुचित जाती‌/ जमाती अत्याचार निवारण कायदा 1989 च्या कलम 3 ( 2 ) 5 नुसार शेख सलिम/शेख अस्लम यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे लेखी आदेश ग्रामिण पोलिस निरीक्षक साहेब यांना देण्यात आले आहे त्यामुळे मा.उपविभागिय आधिकारी तथा दंडाधिकारी यांचे रहिवाशाकडून अभिनंदन केले जात आहे