पुणे: बायकोच्या जाचाला कंटाळून पतीने राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घडना घडली आहे. हा प्रकार पुण्यातील खडकी भागात घडला आहे.

गेल्या वर्षांपासून पत्नी आणि तिच्या माहेरच्या जाचाला कंटाळून पतीने राहत्या घरी गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं आहे. समीर नाईक (वय 38) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. याप्रकरणी समीर यांचे वडील निवृत्ती नाईक यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर नाईक यांचा उषा या महिलेशी विवाह झाला होता. त्यांना एक 12 वर्षाची मुलगी देखील आहे. मात्र गेल्या चार वर्षांपासून उषा आणि तिच्या माहेरचे लोक समीरकडे वारंवार पैशांची मागणी करायचे आणि त्यावरुन त्यांच्यामध्ये अनेक वेळा वाद देखील झाले.

काही रक्कम दिल्यानंतर सुद्धा उषा आणि तिच्या नातेवाईकांनी समीरकडे वारंवार आणखी पैश्याची मागणी करायचे. या गोष्टीचा मानसिक त्रास समीरला होऊ लागला आणि त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. समीर यांच्या पत्नी उषा नाईक हिच्यासह सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात सरसाबाई पंढरकर, रामचंद्र पंढरकर, मालसिंग आढाव यांचा समावेश आहे.

क्षुल्लक कारणावरुन आत्महत्येच्या घटनेत वाढ काही दिवसांपूर्वी एका अकरा वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. शेजारी राहणाऱ्या माय-लेकींनी शिवीगाळ केली. हा अपमान जिव्हारी लागल्याने त्याने आत्महत्या केली होती. रुद्राक्ष लुकेश जाधव असं 11 वर्षीय आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव होतं. तर यासंदर्भात आशा लुकेश जाधव (वय 32, रा. लोहियानगर) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

रुद्राक्ष घरी आल्यावर त्याला वारंवार शिवीगाळ करण्याचा प्रकार गेले. काही दिवस सुरु होता. आरोपी आणि रुद्राक्ष एकाच परिसरात राहायला आहेत. तो सहावीत शिकत होता. तो आरोपींच्या घरी गेला असताना विद्या आणि तिची आई साधना कांबळे यांनी रुद्राक्ष याला शिवीगाळ केली. त्या रागातून रुद्राक्ष याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

रुद्राक्षच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल विद्या आणि साधना कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येच्या घटना पुण्यात सातत्याने समोर येत आहे. क्षुल्लक कारणावरुन होणाऱ्या आत्महत्येच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे जीव फार स्वस्त झाला आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे.