बिरसा मुंडा जयंती निमित्त जनजातीय गौरव दिन साजरा.     

दि.15/11/2022.                

                एकता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला महाविद्यालय, बिडकीन व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बिरसा मुंडा जयंतीच्या निमित्ताने "जनजातीय गौरव दिवस" साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.युसूफ पठाण यांनी भुषविले. प्रमुख वक्ता म्हणून प्राध्यापक मिलिंद ठोकळे मराठी विभाग, कला महाविद्यालय, बिडकीन हे उपस्थित होते. बिरसा मुंडाच्या जयंती निमित्त प्राध्यापक मिलिंद ठोकळे यांनी समाजसेवक, देशभक्त बिरसा मुंडा यांचे जीवन चित्रण या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. बिरसा मुंडाच्या जन्मापासून ते त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत आदिवासी समाजाला जागृत करण्याचं काम त्याचबरोबर आदिवासीची संस्कृती त्यांच्यावर होणारा अत्याचार याला वाचा फोडण्याचे काम व इंग्रजांच्या व भांडवलदाराच्या विरुद्ध जनआंदोलन करून समाजाचे शोषण जी व्यवस्था करते त्यांच्यासाठी एक नारा दिला. "राणी का राज्य खत्म करो हमारा साम्राज्य स्थापित करो" असा नारा देऊन संपूर्ण आदिवासी समाजाला अन्यायाच्या अत्याचाराच्या जोखडातुन मुक्त करणारे बिरसा मुंडा म्हणून त्यांना आदिवासी समाजातील लोक देव समजतात. बिरसा मुंडा यांनी आदिवासीच्या शोषणाविरुद्ध आवाज उठवण्याचा काम केलेला आहे त्याचबरोबर ते इंग्रजा विरुद्ध बंड पुकारून सरदार चळवळीत सामील झाले होते. आदिवासीच्या जमिनी ब्रिटिश सरकारपासून मुक्त करण्यासाठी त्यांना युद्ध करावे लागले आणि म्हणून "आपला देश आपले राज्य" अशी संकल्पना समजून भांडवलदार व इंग्रज बिरसा मुंडाला घाबरु लागले 1857 मध्ये टांगा नदीच्या काठावर झालेल्या युद्धात इंग्रजांचा पराभव झाला त्याचा राग मनात धरून अनेक आदिवासी नेत्यांना अटक करण्यात आली त्यामध्येच बिरसा मुंडाला सुद्धा अटक करण्यात आली या दरम्यान महिला आणि लहान मुलांना या युद्धात मोठा समावेश होता परंतु एका सभेला संबोधित करीत असताना बिरसा मुंडा यांना चक्रधर पुरम मधून अटक करण्यात आली आणि नऊ जून 1900 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा विचार खऱ्या अर्थाने बिहार, झारखंड, ओरिसा, छत्तीसगड, पश्चिम बंगाल मध्ये पेरण्याचं काम आदिवासी बांधवांनी केलेली आहे. त्यांच्या स्मरणार्थ राज्य येथे मध्यवर्ती कराग्रह आणि विमानतळाला बिरसा मुंडा नाव देण्यात आली आहे त्याचबरोबर बिरसा मुंडा आणि आदिवासी हेच खरे इथले मुल निवासी आहेत समाजाला पटवून सांगण्याचा काम केलेला आहे. आपल्या सरकारने बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना तयार केली असून बिरसा मुंडा यांचा विचार आजच्या समाजातील युवकांना प्रेरित करणार आहे असं आपल्या भाषणातून प्राध्यापक मिलिंद ठोकळे यांनी मार्गदर्शन केलेली आहे. या जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. युसुफ पठाण यांनी आदिवासी समाजातील समस्या आणि सरकारची नीती यावर आपलं मनोगत व्यक्त करताना अध्यक्षीय भाषणाचा समारोप केला. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. प्रसाद करंदीकर डॉ. वैशाली पेरके उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अर्चना काटकर मॅडम यांनी केले. कार्यक्रमाची सांगता सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. शेख मुखत्यार सर यांनी आपल्या आभार प्रदर्शन केली या कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक वृंद डॉ. सय्यद मुजीब, डॉ. अंजली काळे, डॉ. रामकृष्ण मुंडे, डॉ. मोहसीन शेख, श्री अण्णासाहेब थिटे, कयूम शेख आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या शेवट सामूहिक राष्ट्रगीत घेऊन करण्यात आला.