वाडा पुनर्वसनचा माजी उपसरपंच माळीवर पुन्हा फसवणुकीचा गुन्हा

( शिक्रापूर प्रतिनिधी ) वाडा पुनर्वसन ता. शिरुर ग्रामपंचायतचा माजी उपसरपंच सचिन उर्फ चंद्रशेखर माळी याच्या विरुद्ध मित्राची कार घेऊन जाऊन मित्राची फसवणूक केल्याने फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सहा महिने पोलिसांना गुंगारा देऊनही पोलिसांनी त्याला अटक केली असताना आता सचिन माळी याने कोरेगाव भीमा येथील एका इसमाची कार घेऊन जाऊन त्याची फसवणूक केल्याने शिक्रापूर पोल्सिंनी वाडा पुनर्वसन गावचा माजी उपसरपंच चंद्रशेखर उर्फ सचिन माळी याच्या विरुद्ध फसवणुकीचा पुन्हा दुसरा गुन्हा दाखल केला आहे.

                             वाडा पुनर्वसन ता. शिरुर ग्रामपंचायतचा माजी उपसरपंच सचिन उर्फ चंद्रशेखर माळी याने यापूर्वी त्याचे मित्र असलेले बाळासाहेब लांडे यांची एम एच १२ एच के ६६७७ की स्कोर्पिओ कार घेऊन जाऊन लांडे यांना कार परत न देता फसवणूक केल्याने त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला मात्र सहा महिन्यांनी पोलिसांनी सचिन माळी याच्या मुसक्या आवळल्या, तर नुकतेच कोरेगाव भीमा येथील महेश कुलकर्णी यांनी देखील फिर्याद दिली असून माळी हा कुलकर्णी यांची एम एच १२ डी ई १९१२ हि सेन्ट्रो कार ऑक्टोबर २०१९ मध्ये काही कामानिमित्त घेऊन गेला, त्यांनतर वारंवार विनंती करुन देखील सचिन माळी याने कुलकर्णी यांची कार आणून दिली नाही, त्यामुळे सचिन माळी हा मित्रांच्या कार घेऊन जाऊन काहीतरी दुरुपयोग करत असल्याचे लक्षात आल्याने महेश सुरेश कुलकर्णी वय ४३ वर्षे रा. कोरेगाव भीमा ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली शिक्रापूर पोलिसांनी वाडा पुनर्वसन गावचा माजी उपसरपंच चंद्रशेखर उर्फ सचिन सीताराम माळी रा. वाडा पुनर्वसन ता. शिरुर जि. पुणे याचे विरुद्ध फसवणूक प्रकरणी पुन्हा गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस नाईक महेंद्र पाटील हे करत आहे.