अनंत श्री विभूषित जगद्गुरुश्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिण पीठ नाणीजधाम यांचा पादुका दर्शन सोहळा व प्रवचन सोहळा वणी दिनांक 12 नोव्हेंबर 2022 रोज शनिवार सकाळी 9 : 00 वाजता अतिशय उत्साहात संपन्न झाला.हा सोहळा वणी शहरातील एच.बी.लॉन, लोकमान्य टिळक महाविद्यालय ( L.T.) कॉलेजच्या मागे, वणी शहर, तालुका वनी जिल्हा यवतमाळ पूर्व येथे घेण्यात आला. अशी माहिती पश्चिम विदर्भ पीठ शेगावचे पीठ प्रमुख कुंडलिकराव वायभासे साहेब , पीठ सहप्रमुख देवेंद्र दलाल साहेब ,पीठ व्यवस्थापक सुरेश मोरे साहेब, जिल्हा निरीक्षक गोविंद उपासे, पीठ जनगणना योजना प्रमुख टेंभेकर साहेब, जिल्हा पालकत्व अशोक गोंदाने, जिल्हाध्यक्ष सचिन वानखडे यांनी दिली.
या सोहळ्याची सुरुवात भव्य अशा शोभायात्रेने सुरुवात करण्यात आली सर्वप्रथम शंकर भाऊ घोगरे यजमानपद यांच्या घरून सिद्ध पादुकांचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. रथामध्ये जगद्गुरुश्रींची प्रतिमा व जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुका यासह ही मिरवणूक गोकुळ नगर, हनुमान मंदिर, आंबेडकर चौक, शिवाजी चौक ,लोकमान्य टिळक महाविद्यालय मार्गे एस. बी .लॉन या ठिकाणी पोहोचली. भव्य अशा शोभायात्रेमध्ये अनेक प्रकारचे देखावे तयार करण्यात आली होती. त्यामध्ये शिवाजी महाराज ,झाशीची राणी लक्ष्मीबाई,महादेव पार्वती, भारतमाता,बंजारा नृत्य, घोडे, भजनी मंडळ, विना, बॅंड पथक,लेझीम पथक कलशधारी महिला, निशानदारी पुरुष यांचा समावेश होता.
या शोभायात्रेचे शुभागमन वाजत गाजत सकाळी अकरा वाजता साई लॉन मंगल कार्यालयातील संत पिठावर झाले. सर्वप्रथम जगद्गुरुश्रींची सामुदायिक आरती संपन्न झाली. या कार्यक्रमात खासदार बाळू धानोरकर साहेब, आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार साहेब, माजी आमदार वामनराव कासावार साहेब, रंगनाथ स्वामी अर्बन बँकेचे अध्यक्ष संजय खाडे साहेब,माजी नगराध्यक्ष तारेन्द्र बोर्डे साहेब, हिंगोली जिल्हा निरीक्षक अविनाश देशमुख साहेब, प्रोटोकॉल अधिकारी संजय शिंदे, भावोजी नागपुरे,गुरु सेवक प्रमुख आरती ताई वर्धेकर,पीठ समितीचे संजीवनी प्रमुख अमोल कोथळकर, देणगी प्रमुख धुमाळे काका, ब्लड इन नीड चे प्रमुख वैभव भिसे,मनसेचे प्रांत उपाध्यक्ष राजुभाऊ उंबरकर,वसंत जिनिंगचे माजी अध्यक्ष देविदास काळे, टिकाराम कोंगरे, रवी बेलरकर ,राजाभाऊ पाथ्रडकर, प्रमोद वासेकर ,शंकर बराटे, पुरुषोत्तम आवारी, जयकुमार आबड, घनश्याम पावडे , विनोद गोडे, गजानन खापणे, रवींद्र धानोरकर, साधनाताई गोहोकार, साधनाताई ठाकरे, राजेंद्र कोरडे, अशोक नागबभिडकर यांची उपस्थिती लाभली होती.मान्यवरांच्या हस्ते सामाजिक उपक्रमा अंतर्गत दुर्बल घटकातील गरजवंतांना 11 शिलाई मशीनचे मोफत वाटप करण्यात आले. त्यानंतर सामुदायिक गुरुपूजन करण्यात आले. याच कार्यक्रमांमध्ये जगद्गुरुश्रींचे अमृततुल्य प्रवचन संपन्न झाले. हजारो भाविकांनी सिद्ध पादुकांचे यावेळी दर्शन घेतले.कार्यक्रमात ज.न.म .प्रवचनकार शोभाताई बाबर यांचे अतिशय सुंदर असे अमृततुल्य प्रवचन संपन्न झाले. त्यांनी आपल्या प्रवचनातून जीवनात गुरु का करावा आपल्या जीवनामध्ये गुरुचे महत्व किती अनन्यसाधारण आहे हे सविस्तरपणे उपस्थित भक्तगणांना समजावून सांगितले. यावेळी जिल्ह्यातील 223 भक्तगण यांनी उपासक दीक्षा घेतली.
जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान तर्फे अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये मरणोत्तर देहदान, रक्तदान शिबिर , आदिवासी पाड्यातील गरीब मुलांसाठी मोफत ड्रायव्हिंग स्कूल, गोरगरिबांच्या मुलासाठी नाणीज येथे इंग्रजी माध्यमाची मोफत शाळा, मोफत रुग्णालय,राज्यातील पाच हायवे वरती 24 तास विनामूल्य अंबुलन्स सेवा अविरतपणे चालू असते, महापुर, भूकंप आदी नैसर्गिक आपत्तीच्या वेळी स्वरूप संप्रदाय समाजाच्या हितासाठी व मदतीसाठी सतत अग्रेसर असतो. अनेक समाज उपयोगी उपक्रम स्व स्वरूप संप्रदायातर्फे राबविले जातात.
याप्रसंगी उपस्थित भक्तगणांसाठी दिवसभर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी हिंदू संग्राम सेनेचे पश्चिम विदर्भ पिठाचे लेफ्टनंट जनरल नागेश भाऊ पांचाळ व त्यांच्या सर्व टीमने हा कार्यक्रम यशस्वीरित्या आणि शिस्तबद्ध रित्या होण्यासाठी अतिशय सुंदर परिश्रम घेतले. तसेच जिल्हा महिला अध्यक्षा दुर्गाताई मेघरे, सचिव प्रभाकर लाकडे , जिल्हा कर्नल भारतीताई धामणकर,युवा प्रमुख प्रणय काळे, संजीवनी प्रमुख दीपक मोरे, शिबिर प्रमुख स्नेहल भोयर, प्रसिद्धी प्रमुख सरिता राऊत,तालुकाध्यक्ष शंकर घोगरे,तसेच वणी येथील यादव भाऊ सातपुते ,विजय मोरे ,नागेश आतमंगल, ममता धोटे, मारेगावचे कैलास डोंगरकर , संजय भिसे,यांच्यासह जिल्हा सेवा समितीचे सर्व पदाधिकारी ,तालुका सेवा समितीचे सर्व पदाधिकारी, संतसंग सेवा केंद्राचे सर्व पदाधिकारी, अखिल भारतीय हिंदू संग्राम सैनिक ,युवा सेना ,महिला सेना ,आरती सेवा केंद्राचे सर्व पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी गुरुमाऊली यांची सांज आरती घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
वरील आशयाची बातमी आपल्या लोकप्रिय दैनिक ........ वर्तमान पत्रातून प्रकाशित करावी ही नम्र विनंती.
गोविंद उपासे ,निरीक्षक
सचिन वानखडे,जिल्हाध्यक्ष
जिल्हा समिती यवतमाळ पूर्व