परभणी, दि. 14 – आज 14 नोव्हेंबर बालदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यलय ते शिवाजी महाराज पुतळा या दरम्यान "बाल हक्क रॅली" चे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, चाईल्ड लाईन व बाल कल्याण समितीच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आलेल्या रॅलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी आंचल सूद गोयल व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. लांडगे यांनी केले.
निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी चाईल्ड लाईनच्या "दोस्ती सप्ताहाचे" उद्घाटन केले व बालकांशी त्यांच्या लहानपणीचे मजेशीर अनुभव कथन केले. "बाल विवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा" घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके, जिल्हा शिक्षण अधिकारी (माध्यमिक) आशा गरुड, अधीक्षक श्री अंधारे, बाल कल्याण समिती अध्यक्ष श्री कात्नेश्वर, सदस्य श्रीमती काळवीट, श्री. चव्हाण, श्री. मेश्राम, श्री. भुजबळ, चाईल्ड लाईन जिल्हा प्रतिनिधी संदीप बेंडसुरे, सदस्य इशरत व जिल्हा महिला व बालविकास कार्यलयातील कर्मचारी उपस्थित होते. तसेच बालगृहातील मुले व कस्तुरबा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थीनीनी सहभाग नोंदविला.