करंदीच्या जिल्हा परिषद शाळेतील साहित्यांची चोरी
( शिक्रापूर प्रतिनिधी ) करंदी ता. शिरुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील स्टोअर रूमचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी शाळेतील साहित्यांची चोरी केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
करंदी ता. शिरुर येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गौतम गायकवाड हे सकाळच्या सुमारास शाळेत आल्यानंतर शाळेत फेरफटका मारत असताना त्यांना स्टोअररूमच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले तसेच दरवाजा उघडा असल्याचे दिसले त्यामुळे त्यांनी शाळेतील शिक्षकांच्या मदतीने स्टोअर रुमची पाहणी केली असता शाळेतील कॉम्प्यूटर, हॉलीबॉल, लेझीम, माईक, फॅन यांसह आदी खेळाचे तसेच शैक्षणिक साहित्य चोरीला गेल्याचे दिसून आले, याबाबत शाळेचे मुख्द्याध्यापक गौतम शंकर गायकवाड वय ५५ वर्षे रा. करंजेनगर शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात इसमांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आजिनाथ शिंदे हे करत आहे.