शिक्रापूर ठाण्याच्या हद्दीत फोफावतेय बेकायदेशीर सावकारी

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

सर्वसामान्य नागरिकांच्या गळ्याला लागतोय चांगलाच फास

( शिक्रापूर प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सध्या बेकायदेशीर सावकारी मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली असून त्यातून सामान्य नागरिकांच्या गळ्याला फास लागून अनेक लहानमोठे गुन्हे घडू लागल्याने सदर सावकारीवर आवर घालणे प्रशासनापुढे आव्हान निर्माण झाले आहे.

                             शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी वारंवार बेकायदेशीर सावकारीच्या घटना घडत असून काही ठिकाणी सावकारीचे प्रकार विकोपाला गेल्याचे दिसून येत आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अनेक गावांमध्ये काही ठिकाणी सावकारांनी नागरिकांना बेकायदेशीरपणे व्याजाने दिलेल्या पैशांसाठी नागरिकांच्या जमिनी, घरे, वाहने नावावर करुन घेतली आहेत, तर काही नागरिकांची जमीन व घरे परस्पर विक्री केल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. तसेच यापूर्वी सावकारांबाबतच्या काही तक्रारी थेट मंत्रालयात पोहोचल्याच्या घटना आहेत, बेकायदेशीरपणे व्याजाने पैसे देत सावकारी करणाऱ्यांमध्ये काही शासकीय अधिकाऱ्यांचा देखील समावेश यापूर्वी उघड झालेला आहे, सध्या शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका गावच्या सध्याच्या सरपंचाने नागरिकांचे कोरे मुद्रांक, कोरे चेक लिहून घेऊन अनेक बेकायदेशीर व्यवहार केल्याचे निदर्शनास आले तर एका गावातील बड्या व्यक्तीने व्याजाच्या पैशासाठी लहान व्यावसायिकाचे अपहरण केल्याचा प्रकार घडून त्याबाबत गुन्हे दाखल झाले आहेत, या आठवड्यात शिक्रापूर येथे एका हॉटेल व्यावसायिकाने एका सावकाराने व्याजाच्या पैशासाठी दमदाटी केल्याचे तर एका युवकाने व्याजाच्या पैशासाठी महिलेची जमीन नावावर करुन घेत महिलेची फसवणूक केल्याबाबतचे गुन्हे या आठवड्यात दाखल झालेले आहे त्यामुळे सध्या शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बेकायदेशीर सावकारांचे धंदे मोठ्या जोमाने सुरु असून त्यांच्या हुकुमशाही मुळे सर्व सामान्य नागरिक मेटाकुटीला आलेले असून नागरिकांच्या गळ्याला सावकारकीचा फास लागला असल्याने येथील सावकारांना आवर घालणे प्रशासनापुढे आव्हान निर्माण झाले आहे.

 –

सावकारांची दमबाजी व दडपशाही . . . . . . .

सावकार हे नागरिकांना पैशासाठी काहीही कर, जमीन विक, गाडी विक, बायकोचे दागिने विक, सालाने रहा, मात्र माझे पैसे दे, तू कोणाकडे गेला तरी काही फायदा होणार नाही, माझी खूप लांब ओळख आहे, माझे काही होणार नाही अशी धमकी देत नागरिकांना दमबाजी करत नागरिकांच्या काही वस्तू देखील जप्त करुन नागरिकांना दडपशाही करत आहे.

 –

नागरिकांनी न घाबरता तक्रार द्यावी – हेमंत शेडगे ( पोलीस निरीक्षक )

शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काही ठिकाणी बेकायदेशीर सावकार नागरिकांना व व्यवसायिकांना त्रास देत असल्याच्या घटना समोर येत आहेत, मात्र सावकारांच्या दहशतमुळे नागरिक तक्रार देण्यास समोर येत नाहीत मात्र नागरिकांनी न घाबरता बिनधास्तपणे तक्रार देण्यास पुढे यावे सावकारांना निच्छितच कायद्याचा बगडा दाखवला जाईल असे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सांगितले.

नागरिकांनी बिनधास्त तक्रार करावी – शंकर कुंभार ( सहाय्यक निबंधक )

खाजगी सावकारांबाबत नागरिकांनी आमच्या सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे तक्रार केल्यास आम्ही चौकशी करुन बेकायादेशीपणे काम करणाऱ्या लोकांवर तातडीने गुन्हे दाखल करु, त्यामुळे नागरिकांनी व्यथित न होता, न घाबरता आमच्या कार्यालयाकडे तक्रारी कराव्यात असे आवाहन शिरूरचे सहाय्यक निबंधक शंकर कुंभार यांनी केले आहे.