नागपूर: मृत्यू कधी कसा ओढावेल हे कोणीही सांगू शकत नाही. नागपूरमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना घडली आहे. यात सिताफळ तोडण्यासाठी गेलेल्या एका चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. त्याच्या अपघाती मृत्यूने सर्व परिसरात शोकाकूल वातावरण निर्माण झाले आहे.
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
लहानपणी सर्वच मुलं फार मस्तीखोर असतात. त्यामुळे त्यांच्यावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते. जरा जरी दुर्लक्ष झाले की, मुलांच्या जीवावर बेतू शकते. असाच प्रकार नागपूरच्या कपिल नगर पोलिस स्टेशन हद्दीत घडला आहे. विहान शाहू हा तीन वर्षांचा चिमुकला त्याच्या घरी खेळत होता. सिताफळचे झाड आणि स्वतंत्र विहीर अशा निसर्गाच्या सानिध्याने त्याचे घर बहरले होते.
मात्र हाच नैसर्गिक अधीवास त्याच्या जीवावर बेतला आहे. झाडाला लागलेले सिताफळ खाण्यासाठी तो झाडावर चढला होता. नेमका तेव्हाच त्याचा पाय फांदीवरुन घसरला आणि तो खाली असलेल्या विहिरीत कोसळला. विहिरीत पडल्यावर तिथे घरातील कोणताही सदस्य उपस्थित नव्हता. त्यामुळे तो विहिरीत पडला आहे हे कुणाला समजलेच नाही.
बराच वेळ मुलगा दिसला नाही म्हणून त्याची आई त्याला शोधू लागली तेव्हा तिच्या हे लक्षात आले. तिने धावत जाऊन विहिरीत पाहिले तेव्हा विहान विहिरीत पडलेला दिसला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तेथे दाखल झाले. विहानला विहिरीतून बाहेर काढल्यानंतर तात्काळ रुग्नालयात देखील दाखल केले गेले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासल्यावर मृत घोषित केले. या घटनेने नागपूर शहरात शोकाकूल वातावरण पसरले आहे.